अंबाजोगाई : आपत्ती कोणतीही असो, त्यात ज्ञानप्रबोधिनीचा पुढाकार महत्त्वपूर्ण असतो. रुग्णसेवा सुरळीत चालावी यासाठी ज्ञान प्रबोधिनीने लोखंडीच्या रुग्णालयास औषधी उपलब्ध करून देऊन मोठी मदत केली. ही मदत रुग्णसेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे, असे प्रतिपादन अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने लोखंडी सावरगाच्या कोविड रुग्णालयास एक लाख रुपयांची औषधी वितरित करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शरद झाडके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, तहसीलदार विपिन पाटील, गटविकास अधिकारी संदीप घोन्सीकर, रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. महादेव केंद्रे, ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे यांची उपस्थिती होती.
यावेळी शरद झाडके म्हणाले, दुष्काळाची आपत्ती असो, की पाणी टंचाई या सर्व रचनात्मक कामात ज्ञान प्रबोधिनीचा पुढाकार सातत्याने आहे. आता कोरोनाच्या आपत्तीतही ज्ञान प्रबोधिनीने भरघोस मदत केली आहे. रुग्णसेवेच्या कामात त्यांनी घेतलेला पुढाकार रुग्णसेवेसाठी मौलिक ठरणार आहे. यावेळी डॉ. अरुणा केंद्रे यांनी लोकसहभागातून रुग्णालयाला मोठी मदत होत असल्याचे सांगितले. रुग्णसेवेत निर्माण होणारे अडथळे व मिळणारी मदत यामुळे रुग्णसेवा सुकर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नंदकिशोर मुंदडा, संदीप घोन्सीकर, विपिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते औषधीचे वितरण रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष महादू मस्के, नगरसेवक सारंग पुजारी, शेख ताहेर, खालील मौलाना, बाळासाहेब पाथरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे. ॲड. संतोष लोमटे, अमोल पवार प्रशांत आदनाक, अनंत अरसुडे, शरद इंगळे यांच्यासह ज्ञान प्रबोधिनीचे स्वयंसेवक उपस्थित होते.
-------
ज्ञानप्रबोधिनीची संवेदनशीलता
शासनाला जी औषधे उपलब्ध होत नव्हती व ज्या औषधांची रुग्णांना नितांत गरज होती अशी सर्व अत्यावश्यक औषधी ज्ञान प्रबोधिनीने उपलब्ध करून दिली आहे. केवळ औषध वितरणच नाही, तर कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकालाही ज्ञान प्रबोधिनीने आवश्यक ती मदत केली आहे. - शरद झाडके, उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई.
----
माणसात ईश्वर, रुग्णसेवेत ईश्वर
ज्ञान प्रबोधिनी माणसात ईश्वर पाहते. ईश्वर हा रुग्णसेवेत आहे. आपत्तीच्या काळात केलेली मदत ईश्वरापर्यंत जाते व शेकडो लोकांचे आशीर्वाद यातून मिळतात. आगामी काळात निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी पुढाकार घेईल. - प्रसाद चिक्षे, समन्वयक, ज्ञान प्रबोधिनी.
---------
===Photopath===
130521\avinash mudegaonkar_img-20210513-wa0073_14.jpg