बीड - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका नक्कीच लोकांमध्ये प्रभाव पाडत आहे. वेगवेगळ्या भागात राज ठाकरेंच्या सभा होत आहेत, या सभांमुळे 8 ते 10 टक्के मतदारांममध्ये प्रभाव जाणवेल. कारण, राज ठाकरे व्हीडिओच्या माध्यमातून जे भाषण करत आहेत ते म्हणजे, हा सूर्य आणि हा जयद्रथ असेच असल्याचं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी म्हटलंय. धनंजय मुंडेंच्या बीड मतदारसंघात आज मतदान होत आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्हीडिओ भाषणाबाजीला कस-पेस्टचं राजकारण म्हटलं आहे. राज ठाकरेंना आम्ही पॉझिटीव्ह गोष्टी दाखवतो, त्यांनी आमच्यासोबत त्यांचा माणूस पाठवावा, म्हणजे डिजीटल गावची दुसरी बाजू त्यांना दिसेल. तर, राज ठाकरेंनी कट पेस्टचा राजकाणार सोडावं, सलग ठोस भूमिका घ्यावी, असा सल्लाही विनोद तावडेंनी राज ठाकरेंना दिला आहे. तर, दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल. त्यांच्या भाषणामुळे 8 ते 10 टक्के मतदार प्रभावित होतील. कारण, राज ठाकरेंचं भाषण हे हा सूर्य आणि हा जयद्रथ असं असल्याचं मुंडेंनी म्हटल आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंनी सकाळीच बीड मतदारसंघातील आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना मुंडेंनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत आपले मत मांडले.
मतदानाला जाण्यापूर्वी धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथचे दर्शन घेतले.