शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

धारूर-माजलगाव रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:49 PM

धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

ठळक मुद्देधारूर घाटातील घटना : साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा दहा लाखांचा ऐवज लुटला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.केज तालुक्यातील सादोळा येथील संभाजी इंगळे यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये (एमएच २० सीटी ११२५) आडस येथील विठ्ठल माने यांचा १६ टन कापूस घेऊन रविवारी रात्री ८ वाजता शेख इलियास शेख मुसा आणि बिभीषण शंकर फसके हे ट्रकचालक केजहून गुजरात मधील अमरोलीकडे जाण्यासाठी निघाले होते.रात्री १० वाजताच्या सुमारास धारूर घाटाच्या पुढे जाताच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा ट्रक अडवला. त्यापैकी दोघेजण तेलगावच्या पुढे जाण्याच्या बहाण्याने विनंती करून ट्रकमध्ये बसले. टालेवाडी फाट्याजवळ त्यांनी ट्रक थांबविला. तेवढ्यात मागून एका जीपमधून आणखी तिघेजण आले.तू आमच्या गाडीला कट मारून आलास असा वाद निर्माण करून त्यांनी थेट ट्रकच्या केबिनचा कब्जा घेतला आणि ट्रक चालविण्यास सुरुवात केली. धावत्या ट्रकमध्ये त्यांनी दोन्ही चालकास लाकडी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने स्वत:जवळील पिस्तूल बाहेर काढत केबिनमध्ये वरच्या दिशेने एक गोळी झाडली. गोळी मारण्याची धमकी देत दोन्ही चालकांना बळजबरीने कसलेतरी औषध पाजले.थोड्या वेळानंतर माजलगाव येथील साखर कारखान्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी ट्रक थांबविला आणि दोन्ही चालकांना जीपमध्ये टाकले. तब्बल दोन-अडीच तास त्यांनी दोन्ही चालकांना जीप मधून फिरवले आणि तोपर्यंत इकडे अज्ञात ठिकाणी ट्रक नेऊन अंदाजे ९ लाख ५३ हजार रुपये किमतीचा सर्व कापूस काढून घेतला.ट्रक संपूर्ण रिकामा केल्याची फोनवरून खात्री होताच जीप मधील दोन्ही ट्रक चालकास बेशुद्ध पडेपर्यंत पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याजवळील २१ हजार रुपये रोख, दोन्ही मोबाईल काढून घेण्यात आले. त्यानंतर दरोडेखोरांनी दोन्ही चालकांना बेशुद्धावस्थेत जालना-मंठा रोडवर ट्रकसहित सोडून दिले.थोड्या वेळाने शुद्धीत आल्यानंतर चालकांनी कसाबसा जवळचा टोलनाका गाठला. तिथल्या लोकांनी दोन्ही जखमी चालकांना जालना येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालक शेख इलियास शेख मुसा यांच्या फिर्यादीवरून बुधवारी सकाळी सहा अज्ञात दरोडेखोरांवर धारूर पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. धारुर घाटात ट्रक लुटत बेदम मारहाण करण्याच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीती पसरली असून, दरोडेखोरांचा तपास लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी