लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी, उमापूर येथे रविवारी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यात हरभरा, ज्वारी, गहू, पपई, मोसंबी, आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.सकाळी ७ वाजता गेवराई शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी, उमापूर, पांचाळेश्वर, बोरीपिंपळगाव, धुमेगाव, महांडुळा, सुरळेगाव, राक्षसभुवनसह अनेक गावांमध्ये गारपीट व वादळी वाºयाने शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खळेगावचे शेतकरी मच्छिंद्र गावडे व मनोज शेंबडे यांनी केली आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची महसूल यंत्रणेने पाहणी केली असून दोन दिवसात सर्व पंचनामे करण्यात येतील, असे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.वडवणीत टरबूज, हरभ-याचे नुकसानवडवणी : तालुक्यातील कवडगाव, देवडी, साळिंबा, पिंपरखेड, मामला, चिंचोटी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. सकाळी ६ च्या सुमारास दहा मिनिटे गारासह पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील गहू आणि ज्वारीचे नुकसान झाले तर टरबूज व इतर फळबागांचे ही नुकसान झाले आहे . तर काढणीसाठी आलेल्या हरभºयाचे घाटे गारांमुळे गळून पडले आहेत. तहसील कार्यालयाचे नैसर्गिक आपत्तीचे एस. दिरंगे म्हणाले की, तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शिरुरात रबीची पिके आडवीशिरूर कासार : तालुक्यात तिंतरवणी महसूल मंडळात गारांसह तब्ब्ल आठ मिलीमीटर पाऊस झाला तर शिरूर कासार मंडळात तुरळक गारांसह दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायमोहा मंडळ निरंक असल्याची माहिती अव्वल कारकून रामराव बडे यांनी दिली.तिंतरवणीसह तागडगाव, फुलसांगवी, पाडळी, आर्वी, खालापुरी भागात अवकाळी पावसासह गारांचाही तडाखा बसला. गहू, मका पीक आडवे झाले असून काढणी केलेला हरभरा, तुरी भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.रायमोह व शिरूर कासार परिमंडळात गारपिटीचे विघ्न टाळले असले तरी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन दिवस गारपिटीचे हे भूत शेतकºयांना भीती दाखवत आहे.माजलगावामध्ये फळबागांना फटकामाजलगाव : तालुक्याच्या काही भागात विशेषत: गोदावरी नदीकाठच्या गावांना गारपीटीने झोडपले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. गोदावरी काठच्या काळेगाव, हिवरा, डुब्बाथडी, टाकरवन, सुल्तानपुर, वाघोरा, वारोळा, राजेगाव, तालखेड, मंगरूळ आदी गावात अर्धा तास लिंबाएवढ्या गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयात हलकल्लोळ उडाला. या गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, पपई यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, टरबूज, पपई, आंबा यासह अनेक फळबागांचे नुकसान झाले असून, फळबागा अक्षरश: भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पंचनामे सुरु आहेतगारपिटीने नुकसान झालेल्या शेतशिवारात महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक सुरेश पळवदे सह अन्य कर्मचारी पाहणी करुन नुकसान क्षेत्राचा पीकनिहाय आढावा घेत असून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.- बालाजी शेवाळेतहसीलदारपालकमंत्र्यांचे पंचनाम्याचे जिल्हाधिकाºयांना आदेशजिल्ह्याला गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. हाच धागा पकडून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त गावांना तातडीने भेटी देण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना केल्या आहेत. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असून शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असेही पालकमंत्री पंकजा मुंंडे यांनी सांगितले.