शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

बीडमध्ये पालिकेचा बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:21 AM

अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

बीड शहरात गल्लीबोळांसह मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले. याचा परिणाम वाहतुकीवर होत होता. अतिक्रमणातून मार्ग काढताना सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमणधारकांना पालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्या.

परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमणधारक स्वत:हून अतिक्रमणे काढत नसल्याचे दिसताच पालिकेने गुरुवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम होती घेतली. साठे चौकापासून मोहिमेला सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात रस्त्यांवर लागलेल्या हातगाड्यांसह छोट्या मोठ्या टपºयांवर हातोडा फिरवण्यात आला. नगर परिषद मार्गे भाजीमंडईत मोहीम पोहचली. येथे काही वेळ भिंत पाडण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. पालिकेने नियमांवर बोट ठेवून भाजीमंडईतील सर्व अतिक्रमणे हटविली.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, विद्युतचे अभियंता मुंडे, ट्रेसर सय्यद लईक, स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके, भागवत जाधव, आर. एस. जोगदंड, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका यांच्यासह शेकडो पालिका, पोलीस कर्मचाºयांसह आरसीपीचे जवान बंदोबस्तावर होता.

कारवाईत सातत्य महत्त्वाचेयापूर्वीचे अनुभव पाहता पुढे अतिक्रमण हटविले की मागे जैसे थे परिस्थिती दिसून येते. कारवाईत सातत्य राहिले तर अतिक्रमण करण्यास कोणीही पुढे येणार नाही. जे पुढे येतील त्यांच्यावर कठोर कारवाईची गरज आहे. या कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाईत पुजा-याने आणला अडथळापालिकेकडून नियमाप्रमाणे अतिक्रमण हटविणे सुरु असताना बशीरगंज चौकातील अतिक्रमित भिंत पाडताना येथील एका पुजा-याने अडथळा आणला. स्वत:च्या डोक्यात दगड मारुन घेत त्याने संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मुख्याधिकारी डॉ. जावळीकर, उप अधीक्षक खिरडकर, सुलेमान यांनी प्रकरण गांभीर्याने हाताळले. कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर या पुजाºयाला रुग्णालयात दाखल करुन अतिक्रमण हटाव मोहीम पुढे सरकली.कारवाईत दुजाभाव नाहीअतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवले जाईल. या कारवाईत दुजाभाव झालेला नाही. कोणाचीही गय केलेली नाही. नागरिकांनी अतिक्रमणे काढून पालिकेला सहकार्य करावे. नसता कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल.- डॉ. धनंजय जावळीकरमुख्याधिकारी, न.प.रस्त्यांनी घेतला मोकळा श्वासअतिक्रमणे हटविल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होईल. याउपरही वाहनधारकांनी वाहने रस्त्यावर उभी केल्यास त्यावर कारवाई केली जाईल. पालिकेच्या मदतीने वाहने जप्तही केली जातील.- सुधीर खिरडकरपोलीस उप अधीक्षक