अनुदानासाठी निराधारांची गर्दी
धारूर : येथे तहसील कार्यालयातून निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी निराधारांनी टपाल कार्यालयात गर्दी केली आहे. सकाळपासूनच निराधारांच्या रांगा लागलेल्या असतात. गर्दीमुळे निराधारांना ताटकळावे लागत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शहरी व ग्रामीण भागाला फटका बसत आहे.
डासांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्वर सिटी परिसरात अद्याप नाल्याचे बांधकाम न झाल्याने रस्त्यावर पाणी साचते. रिकाम्या जागेत पाण्याचे डोह साचल्याने मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत.
श्वानांचा बंदोबस्त करा
बीड : शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने, रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. बंदोबस्त करण्याची मागणी आहे.