शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

अध्यक्षपदी हंगे, सचिवपदी जोशी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:27 AM

बीड जिल्हा वकील संघाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. दिनेश हंगे हे विजयी झाले तर सचिवपदी अ‍ॅड. अभिषेक जोशी यांनी बाजी मारली.

ठळक मुद्देबीड जिल्हा वकील संघ निवडणूक : वन बार, वन वोटचा प्रभावी अंमल

बीड : बीड जिल्हा वकील संघाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. दिनेश हंगे हे विजयी झाले तर सचिवपदी अ‍ॅड. अभिषेक जोशी यांनी बाजी मारली. या निवडणुकीत प्रथमच ‘वन बार वन वोट’चा अंमल करण्यात आला.बीड जिल्हा वकील संघाच्या कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार अ‍ॅड. रणजीत वाघमारे हे बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सहा पदांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. अ‍ॅड. राजेश आर्सुळ यांचा पॅनल व अ‍ॅड. दिनेश हंगे यांचा एकता पॅनल निवडणूक रिंगणात होते.सचिवपद वगळता इतर पदांसाठी सरळ लढत झाल्याने चुरस निर्माण झाली होती. मंगळवारी संघाच्या सदस्य मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावला. मतदानासाठी वकीलांमध्ये उत्साह दिसून आला. रांगा लावून मतदान पार पडले. ८०३ पैकी ७०४ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात मतदान पार पडले. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी करुन निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. बालाप्रसाद करवा यांनी निकाल जाहीर केला. त्यांना मतदान अधिकारी म्हणून त्यांना संजय राजपूत, नितीन वाघमारे, रमेश राऊत, शिवाजी उजगरे, सुधीर जाधव, अशोक हंगे, बालाप्रसाद सारडा, बाबासाहेब बहिरवाळ यांनी सहकार्य केले.एकूण ८५ मते झाली बादअध्यक्षपदासाठी दिनेश हंगे यांना ४३४ तर राजेंद्र आर्सूळ यांना २६३ मते मिळाली ७ मते बाद झाली. हंगे यांचा १७१ मतांनी विजय झाला. उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर चाळक यांना ४२४ मते मिळाली. मोहतासीब यांना २५४ मते मिळाली २६ मते बाद झाली. यात चाळक विजयी झाले.सचिव पदासाठी अभिषेक जोशी यांना ४०९, श्रीकांत जाधव यांना १२२ तर रंजीत करांडे यांना १६३ मते मिळाली. २४६ मतांनी जोशी विजयी झाले १० मते बाद झाली.महिला प्रतिनिधी पदासाठी बबीता पळसेकर यांना ३२४ मते मिळाली तर संगिता भुतावळे यांना ३७० मते मिळाली. ४६ मतांनी भुतावळे विजयी झाल्या. १० मते बाद झाली.ग्रंथपाल सचिव पदासाठी कृष्णा नवले यांना ३२० तर धनराज जाधव यांना ३६३ मते मिळाली २१ मते बाद झाली जाधव ४३ मतांनी विजयी झाले. सहसचिव पदासाठी सय्यद यासेर यांना ३९७ तर किशोर कसबे यांना २९६ मते मिळाली ११ मते बाद झाली १०१ मतांनी यासेर पटेल विजयी झाले.

टॅग्स :BeedबीडadvocateवकिलElectionनिवडणूक