शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

हर हर महादेव! प्रभू वैद्यानाथाचा दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 1:16 PM

पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.

- संजय खाकरेपरळी(बीड): 'हर हर महादेव', 'ओम नमः शिवाय'चा गजर करत पहिल्या श्रावण सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी  श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शिवामूठ तांदूळ व बिल्वपत्र वाहून भक्तांनी दर्शन घेतले. नागपंचमीची मंदिरपरिसरात महिलांनी भूलई खेळली. वैद्यनाथ मंदिरात असलेल्या नागनाथाच्याच्या मंदिरात  पूजन करीत भाविकांनी दर्शन घेतले.

निज श्रावणमासास 17 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. आज 21 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार असल्याने रात्री बारा वाजल्यापासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. हजारो शिवभक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी ट्रस्टच्यावतीने पास व धर्मदर्शनची महिला -पुरुषांची स्वतंत्र रांग आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यात आली. 

वैद्यनाथ मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून पुष्पमाळाने सजविण्यात आले आहे. पुष्प सजावटीमुळे  मंदिर परिसर मनमोहक दिसून येत आहे. सोमवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत मोठी गर्दी होती. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास पुन्हा गर्दी वाढली. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्यासोबत परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख व इतर पदाधिकारी होते.

रात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू झाली तर  दुपारी बारा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याची माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा बाबासाहेब देशमुख ,विश्वस्त राजेश देशमुख यांनी लोकमत ला दिली. 

मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले परळी शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप हे ही मंदिरात पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते. पंचमुखी महादेव मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, सुर्यवेश्वर मंदिर, नगरेश्वर मंदिर व शहरातील व ग्रामीण भागातील मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले होते. वैद्यनाथ मंदिर रोडवर बिल्व पत्र घेण्यासाठी पहाटेपासुनच भाविकांची गर्दी झाली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाविकांना मोफत प्रसादकृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी वैद्यनाथ मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोफत प्रसाद (साबुदाणा खिचडी व राजगिरा लाडू) वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली. 

टॅग्स :Beedबीडspiritualअध्यात्मिक