शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

आडसकरांची हॅटट्रीक

By admin | Published: January 17, 2017 12:12 AM

अंबाजोगाई अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी रमेश आडसकर यांच्या लोकनेते बाबुरावजी आडसकर शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले.

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाईजिल्ह्यातील पहिली सहकारी संस्था म्हणून ख्याती असलेल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी रमेश आडसकर यांच्या लोकनेते बाबुरावजी आडसकर शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. प्रतिस्पर्धी दत्तात्रय पाटील यांच्या अंबासाखर पुनर्जीवन पॅनलला धोबीपछाड देत आडसकर यांनी सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या.आडसकर व पाटील या भाजपच्या दोन दिग्गजांनी स्वतंत्र पॅनल उभे करून प्रतिष्ठा पणाला लावली होती. संचालकपदांच्या २१ जागेसाठी ४३ जण आखाड्यात होते. रविवारी ५२ केंद्रांवर शांततेत मतदान झाले. एकूण १८५०० पैकी १२४४१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सकाळी ८ वाजता येथील अध्यापक महाविद्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. तब्बल १३ तास मॅरेथॉन मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. आडसकरांनी जोरदार मुसंडी मारून पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.विजयी उमेदवार असेवसंत बळीराम चव्हाण- ७१२४, हनुमंत निवृत्ती मोरे- ७०८९, औदुंबर भाऊसाहेब शिंदे- ६८७८, रमेश बाबुराव आडसकर- ७३८९, बब्रूवान रावण खुळे -७०७२, तुळशीराम पांडुरंग राऊत- ७०५१, तानाजी देविदास देशमुख- ७१७१, वसंतराव नारायणराव हारे- ७०२४, श्रीराम गणपत मुंडे- ६९६२, शिवराम सखाराम कदम- ७१०५, अनंत राजेसाहेब पाटील- ७१२३, सुनील अनंत शिंदे - ६९८३, निवृत्ती संतराम चेवले- ७०४३, प्रमोद चंद्रकांत जाधव- ६९६२, जनार्धन रामचंद्र माने- ६९६९, अशोक भागवतराव गायकवाड- ७२५८, सुमन गौतम चौधरी - ७१९८, पूनम बालाजी नांदवटे - ६९५५, अजय शेषेराव ढगे - ७३४७, राजकिशोर कांताप्रसाद मोदी - ७४४५, दाजीसाहेब काशीनाथराव लोमटे- ९० हे उमेदवार विजयी झाले.अंबाजोगाई, केज, परळी, धारूर व रेणापूर तालुक्यातील ३४४ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीत आडसकर व पाटील या दोन पॅनलमध्ये लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या अनेक नेत्यांपैकी कोणी पाटलांना तर कोणी आडसकरांना पाठिंबा दर्शविला होता.