बीड: विविध गुन्ह्यात वर्षानुवर्षे पोलिसांना सापडत नसलेल्या आरोपींना न्यायालयाकडून फरार घोषित केले जाते. जिल्ह्यात आठ महिन्यांत ३२ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून फरार आरोपींची संख्या १३३ इतकी आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींच्या अटकेची कारवाई केली जाते;मात्र आरोपी मिळून न आल्यास त्यांना फरार घोषित केले जाते. त्यासाठी न्यायालयामार्फत जाहीरनामा काढला जातो, त्याद्वारे त्यास फरार असल्याचे जाहीर केले जाते. दरम्यान, जिल्ह्यात १३३ आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांना पकडण्याचे आव्हान जिल्हा पोलीस यंत्रणेसमोर आहे.
...
तीस वर्षांपासून आरोपी सापडेना
न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांमार्फत तपास केला जातो. यात काही आरोपी ३० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यांतील आरोपींचाही समावेश आहे. चोरी, दरोडे, लुटमार, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांतील आरोपी वर्षानुवर्षे फरार आहेत. आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने मोहिमा देखील राबविल्या आहेत.
....
मृत्यूनंतरही तपास सुरुच
पोलिसांच्या अभिलेख्यावर फरार असलेेले काही आरोपी मयत झाले तरी त्यांना शोधून काढण्यात यश आले नाही; मात्र जोपर्यंत त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ते पोलीस दप्तरी फरारच असतात. पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवून ३२ जणांना पकडले होते.
....
उपविभागनिहाय फरारी
....
फरार आराेपींच्या शोधासाठी ठाणे स्तरावरुन तसेच गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रयत्न सुरु असतात. याशिवाय कोम्बिंग, ऑल आऊट ऑपरेशनद्वारेही आरोपींची शोधमोहीम राबविली जाते. पोलीस ठाण्यात फरार आरोपींचे फ्लेक्स लावले असून त्यावर त्यांची नावे देऊन नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
- सतीश वाघ,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
......