कडा : कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बंद असल्या तरी या वर्षी त्या बंद राहून मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरुवातीपासून सुरू राहावे यासाठी देवीनिमगाव जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत येणाऱ्या कोल्हेवस्ती वरील एका तरुणाने वस्तीवरील मुलांसाठी दररोज शाळा भरवायला सुरुवात केली असून चक्क तोच तरुण त्या विद्यार्थांना ज्ञानार्जन देण्यासाठी गुरुजी बनला आहे.
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील जिल्हा परिषद शाळेंतर्गत येणाऱ्या कोल्हे वस्ती येथे सहा, सात विद्यार्थी आहेत. दुसरी व चौथी इयत्तेत ते शिकत आहेत. सध्या मागील वर्षापासून शाळा बंद असून यंदाच्या वर्षी तरी अभ्यासक्रमाला सुरुवात व्हावी म्हणून वस्तीवरील इयत्ता आठवीत शिकणारा चौदा वर्षांचा तरुण ओमकार गणेश कोल्हे यांनी वस्तीवरच एका घरात फळा, खडू, बसण्यासाठी चटई, हे उपलब्ध करून वस्तीवरील मुलांना सर्व विषयांची सोपी मांडणी करून शिकवत आहे. त्याच्या उपक्रमाचे सध्या कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन अभ्यासासाठी नेटवर्क नसते. त्यामुळे मीच सगळ्या वस्तीवरील मुलांना बोलावून रोज शिकवत आहे. मला यात आनंद वाटत असल्याचे ओमकार कोल्हे याने सांगितले.
190721\nitin kmble_img-20210719-wa0048_14.jpg