शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

आरोग्यसेवक झाला म्हणून पेढे वाटले अन् रात्रीतून दुसऱ्याचेच आले नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 2:01 PM

अंबादास सगर आणि अमोल काळे या दोघांची निवड झाल्याची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा प्रकाशित करण्यात आली. मात्र, ८ ऑगस्ट रोजी यातील अमोल काळे हे नाव वगळून गजानन सुतार यांना घेण्यात आले.

ठळक मुद्दे दिलगिरी व्यक्त करून उस्मानाबाद आरोग्य विभागाने हात झटकले बीडच्या तरुणावर उस्मानाबाद आरोग्य विभागाकडून अन्याय

बीड : उस्मानाबाद जिल्हा हिवताप कार्यालयात आरोग्यसेवक म्हणून निवड यादीत नाव आल्याने बीडच्या तरुणाने गावभर पेढे वाटले. ग्रामस्थांनी त्याचा सत्कारही केला. परंतु उस्मानाबाद आरोग्य विभागाने एका रात्रीत सावळागोंधळ करीत या तरुणाचे नावच गायब केले. हा प्रकार रविवारी उघड झाला आहे. हे मुद्दाम झाले नसून अनवधानाने झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त करून उस्मानाबाद आरोग्य विभागाने हात झटकले आहेत. असे असले तरी, या भरतीत अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

मार्च २०१९ साली आरोग्य विभागात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर २८ फेब्रुवारीला यासाठी लेखी परीक्षा झाली. १६ जुलै रोजी याचा निकाल लागला. त्यानंतर राज्याची एकत्र गुणतालिका लावण्यात आली. त्यापाठोपाठ जिल्हानिहाय यादीही लावली. यात निवड करताना जाहिरातीच्या ५० टक्केच जागा भरण्यात आल्या. उस्मानाबाद जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातही आरोग्यसेवक पदाच्या दोन जागा होत्या. यात अंबादास सगर आणि अमोल काळे या दोघांची निवड झाल्याची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा प्रकाशित करण्यात आली. मात्र, ८ ऑगस्ट रोजी यातील अमोल काळे हे नाव वगळून गजानन सुतार यांना घेण्यात आले. हा प्रकार पाहून काळे यांनी आरोग्य विभागाला जाब विचारला असता, अनवधानाने चूक झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, निवड झाल्याने अमोलने गावभर पेढे वाटले होते. त्याचे कुटुंब खूश होते. एका कीर्तन सोहळ्यात सार्वजनिक सत्कारही केला. ग्रामस्थांनीही स्वागत केले आणि आता अचानक आपले नाव गायब झाल्याने आपला अपमान झाला आहे. माझे मानसिक खच्चीकरण झाले असून याला आरोग्य विभाग जबाबदार आहे. याची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी अमोल काळे यांनी केली आहे.

काय म्हणतात, उस्मानाबादचे अधिकारी...याबाबत भरती प्रक्रियेचे अध्यक्ष तथा उस्मानाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे म्हणाले, संचालक व उपसंचालकांकडून आलेल्या सूचनांनुसार यादी लावली. सुरुवातीला यादी प्रकाशित केल्यानंतर, त्यात एक जागा माजी सैनिकासाठी होती, हे नंतर समजल्याने नाव बदलले. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले. तसेच सदस्य सचिव तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पांचाळ यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. हे कसे झाले तेच समजत नाही, असे सांगतानाही ते अडखळले. आपण उमेदवाराला लेखी पत्र देऊन चूक झाल्याचे कळवू, असेही डॉ. पांचाळ म्हणाले.

माझी निवड झाल्याच्या आनंदात सर्वत्र पेढे वाटले. माझा सत्कारही केला. आता अचानक नाव गायब केले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून मला न्याय द्यावा. माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे. अनवधानाने चुका व्हायला ही लहान लेकरं नाहीत. यात मोठाघो ळ झाला आहे.- अमोल काळे, उमेदवार.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस