बीड : गोदामाचे कुलूप तोडून जवळपास २० लाखांची सरकी पेंड व सरकी चोरली. ही घटना १५ एप्रिल रोजी गेवराई तालुक्यातील बागपिंगळगाव शिवारात घडली. याप्रकरणी ४ मे रोजी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय किसनराव मोताळे यांचे बागपिंपळगाव शिवरात सरकी पेंडीचे गोदाम आहे. त्यांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतील ५१० क्विंटल सरकी पेंड व ३०० बॅग सरकी असा मुद्देमाल चोरून नेला. या मालाची किंमत २० लाख ७० हजार रुपये होती. याप्रकरणी मोताळे यांच्या फिर्यादीवरून ५ मे रोजी गेवराई ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती का दिली नाही, त्याचवेळी गुन्हा दाखल का केला नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक टाकसाळे करत आहेत. या सर्व बाबी तपासात उघड होणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
कुलूप तोडून २० लाखांची सरकी चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:34 AM