माजलगांव (बीड), दि. 18 : काही दिवसांपूर्वी शहरातील रविंद्र लताड यांच्या बॅंक खात्यात बॅंकेकडुन नजर चुकीने दीड लाख रूपये जमा झाले. लताड यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रामाणिकपणे ती अतिरिक्त रक्कम बँकेला धनादेशाद्वारे परत केली.
शहरातील एका सहकारी बँकेत लताड यांचे मागील पंधरा वर्षांपासुन खाते आहे. बॅंकेच्या नजर चुकीने लताड यांच्या खात्यात दीड लाख रूपये जमा झाले होते. हि बाब लक्षात येताच लताड यांनी दीड लाख रूपयांची रक्कम आपल्या खात्यात आगाऊ आल्याचे बॅंकेच्या निदर्शनास आणुन दिले. संगणकाच्या तांत्रीक बिघाडामुळे चुकुन ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग झाली होती. यानंतर त्यांनी तात्काळ धनादेशाव्दारे हि रक्कम बँकेस परत केली.
लताड यांच्या प्रामाणिकपणा बद्दल बॅंकेचे शाखा व्यवस्थापक आत्माराम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी तात्यासाहेब शेंडगे, एस. एम. कुलकर्णी, महेश माजलगांवकर, विजय मुळी, दत्ता भंडारे, सुरेश कदम, रवी दळवी, महारूद्र मस्के, अशोक नाईक, परमेश्वर टेंभूर्णे, विनय पोतदार आदींची उपस्थिती होती.