शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

विवाहितेला पळवून पुण्यात नेले, परतताच कोरोनाने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 7:46 PM

पीडितेसह पोलिसांचा घेणार स्वॅब

ठळक मुद्दे बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोनाबाधित माजलगाव तालुक्यात खळबळ

माजलगाव : चार मुलांची आई असलेल्या महिलेस पळवून नेत पुणे गाठले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. नंतर परत येताच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. स्वॅब घेऊन बीडच्या क्वारंटाईन कारागृहात पाठविले. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. माजलगाव ग्रामीण ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी त्याच्या संपर्कात आल्याने त्यांचेही स्वॅब घेण्यात येणार आहेत.

माजलगाव तालुक्यातील एका गावातील मुलांचा बाप असलेल्या २६ वर्षीय व्यक्तीने चार मुलांची आई असलेल्या ३० वर्षीय महिलेला १७ जुन रोजी पुणे येथे पळवून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ८ जुलै रोजी तो परत आला. ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेने त्याच्याविरोधात अत्याचाराची फिर्याद दिली.  ९ जुलै रोजी त्याची वैद्यकीय तपासणी करून दोन वेळा न्यायालयात हजर केले. एकवेळा पोलीस कोठडी तर दुसऱ्या वेळेस त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याचा स्वॅब घेऊन त्याला कारागृहात पाठविण्यात आले. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सर्वत्र खळबळ उडाली.

पीडितेसह पोलिसांचा घेणार स्वॅबआरोपीच्या संपर्कात पीडिता व काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी आहेत. पीडितेचा स्वॅब घेतल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी सांगितले. तर इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांचेही स्वॅब घेण्याच्या हालचाली आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. प्रकरणाची न्यायालयालाही माहिती कळविल्याचे सूत्रांकडून समजते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड