बीड : खिशात दहा रूपये जरी असले तरी काही लोक वारंवार खिसा तपासतात. मात्र मंगळवारी बीडमधील नगर नाक्यावरील मुख्य चौकात वेगळाच अनुभव आला. भाकरीचं जसं गाठोडं घेऊन उभा रहावे, तसेच एक व्यक्ती ५००, १०० च्या नोटांच्या बंडलचे गाठोडं घेऊन उभा होता. ही बाब पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केली. एकीकडे पोलिसांकडून जनजागृती केली जात असतानाही काही नागरिक मात्र आजही किती गाफिल आहेत, याचा प्रत्यय या घटनेवरून येतो.सुनील (नाव बदललेले) हा ३३ वर्षीय तरूण मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नगर नाक्यावरील मुख्य चौकात उभा होता. त्याने बँकेतून जवळपास दोन लाख रूपये काढून आणले. मित्राच्या प्रतिक्षेत असलेल्या सुनिलकडे गस्त घालणारे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल धस यांचे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीकडे धाव घेतली. त्याला समजावून सांगण्याबरोबरच चांगलीच कानउघडणी केली. पोलिसांच्या सुचनेनंतर त्याने आपल्या नातेवाईकाला बोलावून घेतले आणि तेथून माजलगावला मार्गस्थ झाला.दरम्यान, चोरी, घरफोडी, लुटमार यासारख्या घटनांपासून सावध राहण्याबाबत पोलिसांकडून जनजागृतीसह आवाहन केले जात आहे. तरी सुद्धा नागरिक गाफील रहात आहेत. त्यामुळेच चोरी, लुटमार, फसवणूक अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. लोकांनी पैैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगली तर असे प्रकारांना आळा बसू शकतो.यापूर्वीही घडलीहोती घटनासाधारण चार महिन्यांपूर्वी सुनील उभा असलेल्या ठिकाणावरूनच कार चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती.या भागात चोरट्यांचा वावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. हाच धागा पकडून गस्त घातली जात होती. सपोनि अमोल धस व त्यांच्या टिमच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.
भाकरीचं नव्हे, पैशाचं गाठोडं घेऊन ‘तो’ चौकात उभा होता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:46 AM
खिशात दहा रूपये जरी असले तरी काही लोक वारंवार खिसा तपासतात. मात्र मंगळवारी बीडमधील नगर नाक्यावरील मुख्य चौकात वेगळाच अनुभव आला. भाकरीचं जसं गाठोडं घेऊन उभा रहावे, तसेच एक व्यक्ती ५००, १०० च्या नोटांच्या बंडलचे गाठोडं घेऊन उभा होता.
ठळक मुद्देपोलिसांकडून कानउघाडणी : जनजागृती करूनही नागरिकांचा गाफीलपणा