"जो मुलीला ग्रामपंचायतमध्ये निवडून आणू शकत नाही, तो लोकसभेत काय करणार": अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 07:54 PM2024-05-11T19:54:09+5:302024-05-11T19:57:05+5:30

पंकजा ताईचे काम जो जोरात करेल त्याचाच विचार मी विधानसभा निवडणुकीत करेल - अजित पवार

He who cannot get his own daughter elected to Gram Panchayat, what will he do in Lok sabha lection: Ajit Pawar | "जो मुलीला ग्रामपंचायतमध्ये निवडून आणू शकत नाही, तो लोकसभेत काय करणार": अजित पवार

"जो मुलीला ग्रामपंचायतमध्ये निवडून आणू शकत नाही, तो लोकसभेत काय करणार": अजित पवार

- नितीन कांबळे
कडा (बीड) :
जो स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये निवडून आणू शकत नाही. तो खासदारकीच्या निवडणुकीत काय करणार, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लगावला. सर्वांनी जोरदार कामाला लागा, मनात काही किंतुपरंतु ठेवू नका, पंकजा ताईचे काम जो जोरात करेल त्याचाच विचार मी विधानसभा निवडणुकीत करेल, असा इशारा देखील पवार यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना यावेळी दिला.

बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे याच्या प्रचारार्थ आष्टी तालुक्यातील कडा येथील श्अमोलक जैन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, जिल्हाचा मागसलेपणा पुसून टाकण्यासाठी दळणवळण, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, उद्योग व्यवसाय उभारून रोजगार उभा करण्यासाठी निधीची गरज असते. विकासासाठी  राजकारणात थोड मागेपुढे सरकावे लागते. पण स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणी काही बोलतो, आम्ही ९६ कुळी मग आम्ही काय ९२ कुळी आहोत का? आम्हालाही बोलता येते पण आम्ही तारतम्ये बाळगतो. दुध उत्पादकांचा पै ना पै तुमच्या खात्यावर जमा होईल. आपण सर्वांनी पंकजा मुंडे यांना मोठ्या मताने निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री धनजंय मुंडे, रासपचे महादेव जानकर, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, बाळासाहेब आजबे, भिमराव धोंडे, पप्पू कागदे, डाॅ. योगेश क्षीरसागर, ॲड.भाऊसाहेब लटपटे, माऊली जरांगे, सतिश शिंदे, प्रकाश कवठेकर, ॲड.साहेबराव म्हस्के, विठ्ठल सानप, शिवाजी राऊत आदींची उपस्थित होती.

मंडप मोठा का नाही टाकला 
सभेसाठी कमी क्षमतेचा मंडप टाकल्यावरून संयोजकावर अजित पवार यांनी नाराजगी व्यक्त केली. ऊन्हाचा पारा वाढला आहे. छोटा मंडप का टाकला? ही महायुतीची सभा आहे.लक्षात यायला हवं मंडप मोठा टाकायला हवा पाहिजे, अशी जाहीर नाराजगी पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: He who cannot get his own daughter elected to Gram Panchayat, what will he do in Lok sabha lection: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.