शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

"जो मुलीला ग्रामपंचायतमध्ये निवडून आणू शकत नाही, तो लोकसभेत काय करणार": अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 7:54 PM

पंकजा ताईचे काम जो जोरात करेल त्याचाच विचार मी विधानसभा निवडणुकीत करेल - अजित पवार

- नितीन कांबळेकडा (बीड) : जो स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये निवडून आणू शकत नाही. तो खासदारकीच्या निवडणुकीत काय करणार, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लगावला. सर्वांनी जोरदार कामाला लागा, मनात काही किंतुपरंतु ठेवू नका, पंकजा ताईचे काम जो जोरात करेल त्याचाच विचार मी विधानसभा निवडणुकीत करेल, असा इशारा देखील पवार यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना यावेळी दिला.

बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे याच्या प्रचारार्थ आष्टी तालुक्यातील कडा येथील श्अमोलक जैन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, जिल्हाचा मागसलेपणा पुसून टाकण्यासाठी दळणवळण, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, उद्योग व्यवसाय उभारून रोजगार उभा करण्यासाठी निधीची गरज असते. विकासासाठी  राजकारणात थोड मागेपुढे सरकावे लागते. पण स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणी काही बोलतो, आम्ही ९६ कुळी मग आम्ही काय ९२ कुळी आहोत का? आम्हालाही बोलता येते पण आम्ही तारतम्ये बाळगतो. दुध उत्पादकांचा पै ना पै तुमच्या खात्यावर जमा होईल. आपण सर्वांनी पंकजा मुंडे यांना मोठ्या मताने निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री धनजंय मुंडे, रासपचे महादेव जानकर, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, बाळासाहेब आजबे, भिमराव धोंडे, पप्पू कागदे, डाॅ. योगेश क्षीरसागर, ॲड.भाऊसाहेब लटपटे, माऊली जरांगे, सतिश शिंदे, प्रकाश कवठेकर, ॲड.साहेबराव म्हस्के, विठ्ठल सानप, शिवाजी राऊत आदींची उपस्थित होती.

मंडप मोठा का नाही टाकला सभेसाठी कमी क्षमतेचा मंडप टाकल्यावरून संयोजकावर अजित पवार यांनी नाराजगी व्यक्त केली. ऊन्हाचा पारा वाढला आहे. छोटा मंडप का टाकला? ही महायुतीची सभा आहे.लक्षात यायला हवं मंडप मोठा टाकायला हवा पाहिजे, अशी जाहीर नाराजगी पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ajit Pawarअजित पवारPankaja Mundeपंकजा मुंडे