लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शासनाकडून निधी अपुरा असल्याने आणि रूग्ण संख्या अधिक असल्याने अनंत अडचणींचा सामना जिल्हा रूग्णालय प्रशासनाला करावा लागत होता. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी स्वत:सह इतरांना मदतीचे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद देत आतापर्यंत जवळपास ३० लाख रूपयांचा निधी जमा करून त्यातून रूग्णांसाठी साहित्य उपलब्ध केले आहे. मागील दीड वर्षापासून आरोग्य सेवेसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत.मागील दीड वर्षांपासून जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयांचा कारभार सुधारला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी रूग्णालयांना अचानक भेटी दिल्या. स्वत: काम करण्याबरोबरच सहकाऱ्यांकडून काम करून घेतले. त्यामुळे आज जिल्हा रूग्णालय विविध उपचार पध्दती व शासनाच्या आरोग्य सेवा योजनांमध्ये राज्यात अव्वल आहे. मात्र हे करीत असताना रूग्णालय प्रशासनाला अनंत अडचणी आल्या. साधन सामग्री नसणे, औषधांचा तुटवडा तसेच इतर सुविधांचा यामध्ये समावेश होता. शासनाकडून निधी आला नसला तरी लोकसहभागातून हे शक्य करण्याचा निर्णय डॉ.थोरात यांनी घेतला. हे करताना त्यांनी स्वत:पासून सुरूवात केली.रूजू होतानाच हार तुºयांऐवजी औषधी द्या, असे त्यांनी आवाहन केले. यामध्ये तब्बल दीड लाख रूपयांचे औषधी जमा झाले. त्यानंतर मुलाच्या वाढदिवसानिमित्त दीड लाखांची एक्स-रे मशीन उपलब्ध करून दिली. स्वत: डॉ.थोरात यांच्या पुढाकारामुळे नंतर अनेक हात सरसावले. डॉ.काकाणी, स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान, राज्याचे धर्मादाय आयुक्त श्विकुमार डिगे, जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, जिल्हा रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका, डॉ.शिवणीकर यांनी रूग्णालयासाठी मदत केली. या सर्वांमुळे आता डॉ.सुनील राऊतमारे, डॉ.विजय घोळवे, डॉ.ज्ञानोबा मुंडे यांनीही पुढाकार घेत तीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास यांचीही यासाठी मदत मिळत आहे.दरम्यान, डॉक्टर, परिचारीका व कार्यालयीन स्टाफचेही यासाठी सहकार्य मिळत आहे.असा मिळाला लोकसहभागातून निधीधर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे - आयसीयूमधील मल्टीपॅरा मॉनिटरसाठी साडे सहा लाख रूपयेडॉ.अशोक थोरात - मुलाच्या वाढदिवसानिमित्त दीड लाखांची एक्स-रे मशीन व दीड लाखांचे औषधीस्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाण-आयसीयूमधील बेडसाठी दोन लाखांचा निधीडॉ.कमलाकर आंधळे-आयसीयूसाठी ७५ हजारांचे एक मल्टीपॅरा मॉनिटरजिल्हा रूग्णालयातील शिपाई ते सीएस यांचा एक दिवसाचा पगार - ५ लाख रूपयांतून आयसीयूमध्ये एसीची सुविधाडॉ.शिवणीकर - शस्त्रक्रियेसाठी २० हजार रूपयांची साधन सामग्रीडॉ. सुनिल राऊतमारे, डॉ.विजय घोळवे, डॉ.ज्ञानोबा मुंडे - तिघांकडून ३ सोनोग्राफी मशीन उपलब्ध (किंमत किमान १५ लक्ष रूपये)यासह १ ते १५ हजार रूपयांपर्यंत अनेकांनी मदत केली आहे.
माणुसकीच्या हातांमुळे आरोग्य सेवा झाली सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:52 AM