अंबाजोगाई : आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेत निर्माण झालेल्या गोंधळाचा व बेजबाबदार कारभाराचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बोंब मारून निषेध करण्यात आला. शनिवारी घटनांदूर येथे हे आंदोलन झाले.
महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य विभागाचा ‘क’ व ‘ड’ संवर्गातील विविध जागांसाठी भरतीप्रक्रिया राबिण्यात येत आहे. या भरतीसाठी घेतली जाणारी पूर्वपरीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार होती. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा एक दिवसांवर येऊन सुद्धा विद्यार्थांना हॉल तिकीट मिळाले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र ‘उत्तर प्रदेश’ व काही विद्यार्थ्यांना तर परीक्षा केंद्र कोड हा ‘चीन’ असल्याचे हॉल तिकीट मिळाले. यामुळे आरोग्य विभागातील परीक्षेतील सावळा गोंधळ समोर येतो. कुठल्याही प्रकारची पारदर्शकता या परीक्षेमध्ये दिसून येत नाही. अनेक ठिकाणी या परीक्षेमध्ये आर्थिक सट्टेबाजी होत असल्याचे आरोपदेखील करण्यात आलेले आहेत.
या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने नामुष्कीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुळात हा सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे. हा दूर करू न शकल्यामुळे शासनाने नामुष्कीने हा मार्ग स्वीकारला आहे, असा आरोप अभाविपने केला आहे.
यावेळी अभाविप जिल्हा छात्रशक्तीप्रमुख बालाजी सालपे, शहरमंत्री रामेश्वर गाढवे, शिवकुमार मुरूडकर, सौदागर शिंदे, अभिजीत वैद्य, सागर शिंदे, विशाल चांदणे, सौरव वाघमारे, राम भांडे व विद्यार्थी उपस्थित होते.
250921\img-20210925-wa0076.jpg
आरोग्य विभाग भरती प्रक्रियेतील गोंधळाचा अभाविपतर्फे बोंबा मारून निषेध करण्यात आला.