बीड : कार्यालयात येण्यावरून कार्यालयीन अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्यात ‘अरे-तुरे’ झाल्याने वाद शिगेला पोहचला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात घडली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामांची अडवणूक केली जात असल्याने हे वाद होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.आडस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा केकान हे कराच्या संबंधित माहिती घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात आले होते. ते लिपीकाकडून माहिती घेत असतानाच कार्यालयीन अधीक्षक सुनिल घोडके यांनी ‘कोणाच्या परवानगीने कार्यालयात आलास’ अशी विचारणा केली. याच मुद्यावरून दोघांत वाद झाले. आम्ही पण अधिकारी आहोत, नीट बोला. शासकीय कार्यालयात येण्यासाठी परवानगीची गरज काय, आणि आम्ही पण अधिकारी आहोत, असे म्हणत केकान यांनीही प्रत्युत्तर दिले. याचवेळी दोघांमध्ये चांगलीच जुंपली. अरे-तुरेची भाषा सुरू झाली. परंतु इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. त्यानंतर हे दोघेही पार्किंगमध्ये गेले. तेथेही दोघांमध्ये चांगलीची बाचाबाची झाली. हाणामारीत रुपांतर होणार एवढ्यात पुन्हा एकदा कर्मचाºयांनी धाव घेतल्याने घटना टळली. या वादाची चर्चा वाºयासारखी आरोग्य विभागात पसरली आहे.दरम्यान, वेतनासंदर्भातील कामे, कागदपत्रांची पडताळणी, दैनंदिन आदि कामांबाबत कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांकडून अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडून पुढे येत आहेत. यापूर्वीही अनेकदा टोकाचे वाद झालेले आहेत. तरीही अद्याप सुधारणा झालेली नाही. या वादांमुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसत आहे. हे वाद मिटवून डॉक्टर, कर्मचाºयांची कामे वेळेवर मार्गी लावण्याचे आव्हान वरिष्ठांसमोर असणार आहे.
आरोग्य विभागात अधीक्षक, डॉक्टरांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:32 PM
कार्यालयात येण्यावरून कार्यालयीन अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्यात ‘अरे-तुरे’ झाल्याने वाद शिगेला पोहचला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात घडली.
ठळक मुद्देकार्यालयात येण्यावरून वाद : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील प्रकार