धारूर : शहरातील कसबा भागात आठवड्यापासून डेंग्यूचा फैलाव झाल्याने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा बेग व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांच्यासह साथरोग पथकाने सोमवारी सकाळी दिवसभर स्थळ पाहणी केली. सर्वेक्षण करून नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील कसबा भागात रुग्णसंख्या वाढण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर परिषदेने शनिवारी या भागात धूर फवारणी तसेच काही भागात स्वच्छता केली होती. सोमवारी डॉ. मिर्झा बेग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी शिनगारे गल्ली, वीर पांडुरंग चौक, धनगर वाडा, जाधव गल्ली येथे साथ रोग नियंत्रण पथकाने सूक्ष्म तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले. नवीन संशयित ताप रुग्ण सर्व्हेक्षण, कायमस्वरूपी डास उत्पत्ती स्थाने, गप्पी मासे पैदास केंद्रांची पाहणी करून नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. या पथकामध्ये पी. एस. घाडगे, सी. एस. ठोंबरे, एच. डी. सानप, मनीषा सोनवणे, सुनील तिडके आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी हाेते.
पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडा.
धारूर शहरातील कसबा भागातील नागरिकांनी आपल्या घरातील टाक्यांतील पाण्यात गप्पी मासे सोडून डासांची उत्पत्ती थांबवावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांनी केले. कोरडा दिवस पाळावा. शहरातील डास उत्पत्ती स्थाने, दूषित स्थळे नष्ट करण्यात आली आहेत. नागरिकांनी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी कोरडा दिवस पाळून डासांची उत्पत्ती थांबवावी, असे अवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी केले.
☰
Template
Image Attachment
Photo Manager
Social Media
Metadata
Attach Document
Translate
Backup
Agency
QrCode
Attch Audio/Video
190721\09035224img-20210719-wa0096.jpg
आरोग्य विभागाचे कसबा विभागात सर्वेक्षण