शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

बीड जिल्ह्यात गारांचा पाऊस; छावण्यांमध्ये धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:02 AM

मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देअवकाळीने झोडपले : आंब्यांचे नुकसान; अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव, केजमध्ये पर्जन्यवृष्टी

बीड : मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अंबाजोगाई परिसरात गारांचा पाऊस झाला. तर अनेक ठिंकाणी वीज पुरवठा विस्कळीत झाला. वादळी वारे आणि पावसामुळे चारा छावण्यांच्या ठिंकाणी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी छावण्यांचे निवारा शेड तसेच घरांवरील पत्रे उडाले. आंब्यालाही फटका बसला.मागील दहा दिवसांपासून तापमानाने चाळिशी ओलांडली होती. अलिकडच्या दोन दिवसात तीव्रता वाढल्याने लोक त्रस्त होते. यातच गुरुवारी सकाळपासून उष्णतेत वाढ झाली मात्र काही तासानंतर पारा घसरत गेला. वादळी वारे, गारांचा तर कुठे सौम्य स्वरुपाचा पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.अंबाजोगाईत गारा पडलाअंबाजोगाई शहरासह तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. या अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. दुपारी तीन नंतर विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला. अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या गारपिटीचा फटका शेतीला बसला असून आंबा आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.लोखंडी सावरगावात तासभर पाऊसलोखंडी सावरगाव व परिसरात विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्या. तसेच घाटनांदूर, पूस, जवळगाव, बर्दापूर, बनसारोळा भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंब्याचे नुकसान झाले.केज तालुक्यातील विडा परिसरात वाºयामुळे छावण्यांचे कपडे उडाले, घरांवरील पत्रे उडाले. केज तालुक्यातील कासारी गावात नवनाथ सानप यांच्या कडबा गंजीवर वीज पडून जळत आहे . शिरुर भागात तसेच गेवराई तालुक्यातील तालखेड परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला. मादळमोही येथे वीज पडून सरकीचा फास जळून गेला.वीज कोसळून बैल ठारवडवणी तालुक्यातील पुसरा शिवारात गोविंद नानू राठोड हे शेतातील कामे आटोपून बैलांना चारा खाण्यासाठी मोकळे सोडले. गुरु वारी दुपारी बैल चरत असताना अचानक वीज पडल्याने एक बैल जागीच ठार झाला. दुसरा बैल जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच तलाठी भूषण पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व तालुका प्रशासनाला माहिती दिली. या घटनेमुळे राठोड यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.केज, अंबाजोगाईत बत्ती गुलअवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे अंबाजोगाई परिसरात दुपारी अडीच वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला. तर केज भागात सायंकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला. जिल्ह्यात इतर ठिंकाणीही वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.छावण्यातील निवारा उघड्यावरआष्टी तालुक्यातील दादेगाव येथे अचानक झालेल्या वादळी वाºयामुळे शेतकरी वर्गाने उभारलेल्या अनेक छावण्यांचा निवारा शेड उडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे मुक्या जनावरांचे खूप हाल झाले.महिलेचा मृत्यूधारूर तालूक्यात धुनकवड क्र. २ येथे शेतात कापणी करुन टाकलेला कडबा गोळा करताना वीज पडल्याने संदीप काळे याचा भाजून मृत्यू झाला. केज तालुक्यातील तांबवा येथे शेतात काम करताना पाऊस, वाºयामुळे आंब्याच्या झाडाखाली आडोशाला उभी असताना तारामती चाटे नामक महिला वीज पडल्याने ठार झाली.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस