गेवराईच्या तीन मंडळात दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी
बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. रविवारी रात्री व सोमवारी पहाटे आठ मंडळात मुसळधार पाऊस झाला. बीड तालुक्यात नवगण राजुरी ६७ मिमी, पिंपळनेर ६८.८ व लिंबागणेश मंडळात ६५ मिमी पाऊस नोंदला. तर पाटोदा तालुक्यात पाटोदा मंडळात ७५.३, दासखेड मंडळात ७०.८ मिमी पाऊस झाला. गेवराई तालुक्यातील मादळमोही मंडळात ६७.३, पाचेगाव ६६.३ आणि उमापूर मंडळात ७५ मिमी पाऊस झाला.
आतापर्यंत ६९१ मिमी पाऊस
मागील २४ तासात बीड तालुक्यात ५२.८ मिमी, पाटोदा ६१, आष्टी १५.१, गेवराई ५४.१, माजलगाव ३१.१, अंबाजोगाई २१.३, केज २०.४, परळी २९.७, धारूर ३२.५, वडवणी ५० आणि शिरूर कासार तालुक्यात ४३.७ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ६९१ मिमी एकूण पाऊस झाला आहे.
------------
आठवडाभरात तलावही तुडुंब भरले
बीड जिल्ह्यातील एक मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. कांबळी, सिंदफणा, कडा, महासांगवी, कडी, बिंदुसरा हे सह मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चालू सप्ताहात ६ मध्यम प्रकल्प भरले आहेत. तर चालू सप्ताहात ३८ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले. मागील आठवड्यात ४ लघु प्रकल्प भरले होते. एकूण ४२ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
----------