शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

जोरदार पावसाने कडी नदीला पूर; पर्यायी पूल दुसऱ्यांदा गेला वाहून!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:12 PM

सव्वा महिन्यात एकच पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले. 

- नितीन कांबळेकडा (बीड): मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावरील पर्यायी पूल आज सकाळी झालेल्या जोरदार पावसाने कडी नदीला पूर आल्याने पुन्हा एकदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, हा पर्यायी पूल ९ जुलै रोजी देखील जोरदार पावसाने वाहून गेला होता. सव्वा महिन्यात एकच पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले. 

बीड-नगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कडा येथे मुख्य पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी नळकांडी पुल तयार करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी झालेल्या पावसाने भरावासह पूल वाहून गेला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुन्हा मातीचा भराव टाकून पूल उभा करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी ( दि. १७) रात्री झालेल्या पावसामुळे कडी नदीची पाणी पातळी वाढत गेली आणि आज शनिवारी सकाळीच हा पर्यायी पूल पुन्हा एकदा वाहून गेला. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून एका बाजून वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

मुख्य पूल खुला केलापर्यायी पुल वाहून गेला असून आता मुख्य पुल रहदारीसाठी खुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. -राजेंद्र भोपळे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

टॅग्स :RainपाऊसBeedबीड