आष्टी : तालुक्यातील कडा व परिसरातील गावांमध्ये रविवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील अनेक दिवसांपासून कडा, धानोरा या गावांसह परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. रविवारी कडा, धानोरा, निमगाव चोभा, नांदा, टाकळी शेरी, केरुळ, साबडखेड परिसरात तासभर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. जोरदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. या पावसामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला असून, बळीराजा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला असून, पेरण्यांच्या कामाला वेग येऊन शेतमजुरांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
जमिनीमध्ये पुरेशी ओल झाल्यावरच आणि चांगला वापसा झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. पेरणीपूर्वी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे आणि बियाण्यास योग्य बीजप्रक्रिया करावी.
- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी
===Photopath===
140621\img-20210614-wa0379_14.jpg~140621\img-20210614-wa0380_14.jpg