गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार झाले. तर, तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर कार चालकासह सर्वचजण फरार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान मादळमोही पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मादळमोही हे बाजारपेठेचे गाव आहे. येथून अॅपेरिक्षा (एम.एच.२० यु.४१५७) हा प्रवासी घेऊन पाडळसिंगीकडे निघाला होता. एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या कार (एम.एच.२१ ए.एक्स.५३०३) ने रिक्षाला जोराची धडक दिली. गाडीच्या धडकेने रिक्षा महामार्गाच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळला. यामध्ये रिक्षाचालक असिफ शेख (रा. मादळमोही) व सुनिल शिंगाडे (रा. शिंगारवाडी ता. गेवराई) हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षामधील अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, हा अपघात घडल्यानंतर तात्काळ मादळमोहीच्या ग्रास्थांनी जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघात घडताच कार तेथेच सोडून कारचालक व इतरांनी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.अपघातांची संख्या वाढलीकल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत अनेक छोटी-छोटी गावे, वाड्या वस्त्या आहेत. त्याठिकाणी परिवहन महामंडळाची बस जात नाही. त्यामुळे पर्याय नसल्यामुळे या गावांमधील नारिकांना खासगी रिक्षातून प्रवास करावा लागतो. दरम्यान महामार्ग असल्यामुळे इतर वाहनांचा वेग हा कायम वाढलेला असतो. त्यामुळे मागील वर्षात रिक्षा व इतर वाहनांमध्ये होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अपघात होण्याची नेमकी कारणं शोधून उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, महामार्गाशी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
कार-रिक्षाची जोरदार धडक; दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:03 AM
गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार ...
ठळक मुद्देतीन गंभीर जखमी। कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील मादळमोहीची घटना