: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मागील आठवड्यात पुरामुळे संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त झालेल्या गावांना बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पूरग्रस्तांना बुधवारी मदत पाठवण्यात आली.
महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, कराड, महाड, चिपळूण आदि भागात आलेल्या महापुराने या गावचे संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त करून टाकले होते. सातारा जिल्ह्यात दरड कोसळून अनेक माणसं मृत्युमुखी पडली होती.
या गावातील नागरिकांना आर्थिक मदतीची गरज नसून, त्यांना कपडे व खाण्यासाठी अन्नधान्याची गरज आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत पाठवण्यात आली. प्रत्येक तालुका स्तरावरून ही मदत गोळा करून पाठवण्यात आली असल्याची माहिती माजलगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष संध्या भांडेकर यांनी दिली.
ही मदत पाठवण्यात आली. यावेळी डी. बी. बागल, के.के. वारे, युवक प्रदेश सचिव के.के. लढणारे, मराठवाडा महिला समन्वयक ॲड. प्रज्ञा खोसरे, जिल्हाध्यक्ष संगीता तुपसागर, माजलगाव तालुकाध्यक्ष संध्या भांडेकर व तालुका कार्याध्यक्ष अनिता वाघमारे आदि उपस्थित होते.
290721\purusttam karva_img-20210729-wa0012_14.jpg