म. बसवेश्वर जयंतीनिमित्त विधायक उपक्रम
अंबाजोगाई : जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देणारे समाजसेवक व कोरोना योद्ध्यांना महात्मा बसवेश्वर सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जयंतीचा अनावश्यक खर्च टाळून स्वा.रा.ती. शासकीय वैद्यकीय रुग्णालयांस अत्यावश्यक साहित्य सामाजिक बांधिलकीतून देण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली.
१४ मे रोजी शहरात उत्सव समितीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव सुक्रे, समाजसेवक अनिकेत लोहिया, समाजसेवक प्रसाद चिक्षे, कोरोना योद्धे डॉ. विनय नाळपे, डॉ. विशाल लेडे, अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, कोरोना योद्धा डॉ. नागेश, डॉ. इरा ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार, कोरोना योद्धे मल्हारी जोगदंड, बाळासाहेब गायके आदींना त्यांच्या घरी जाऊन महात्मा बसवेश्वर सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. समितीच्या वतीने रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या कमोड खुर्च्या, सॅनिटायझर फवारणी यंत्र, रुग्णांना चालण्याचे वॉकर अशा वस्तू अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव सुक्रे यांच्याकडे सोपविण्यात आल्या. याप्रसंगी स्वा.रा.ती. रुग्णालयाचे कोविड विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी, उपमुख्याध्यापक एस.के. निर्मळे, रवी मठपती, गणेश काळे, प्रसाद कोठाळे, तोडकरी, शैलेश स्वामी, दीपक मंगे, संतोष काळे, योगेश पोखरकर, वैभव पोखरकर, गौरव लामतुरे, संजय साळवे, गणेश रुद्राक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
150521\avinash mudegaonkar_img-20210515-wa0068_14.jpg