शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

ग्राहकांना खूश करत नाही म्हणून नर्तिकेला डांबून तिच्या १२ वर्षांच्या मुलीला केले गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 2:39 PM

नकार दिल्याने लाठी-काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अंधाऱ्या खोलीत रात्रभर डांबून ठेवले.

बीड : पतीने वाऱ्यावर सोडल्याने दोन मुलींना जगविण्यासाठी तिने कला केंद्राची वाट धरली. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कोणाची...’ म्हणत ती दोन मुलींकडे पाहून जीवन कंठत होती. मात्र, पाय दुखत असल्याने एके दिवशी नाचण्यास नकार दिला. ग्राहकांना खूश करत नाही म्हणून केंद्रचालकांनी तिला डांबले. त्यानंतर तिच्या १२ वर्षीय मुलीला गायब केले. हा धक्कादायक प्रकार मांजरसुंबाजवळ (ता. बीड) येथे १३ जून रोजी उघडकीस आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मूळची सेलू (जि. परभणी) येथील ३० वर्षीय सीमा (नाव बदललेले) पाच वर्षांपूर्वी मांजरसुंबा येथील कला केंद्रात दाखल झाली. तिला पतीने सात वर्षांपूर्वी सोडून दिलेले आहे. पदरात दोन चिमुकल्या मुली असल्याने नाईलाज म्हणून तिने कला केंद्राची पायरी चढावी लागली. दरम्यान, १ जून रोजी रात्री ८ वाजता पाय दुखू लागल्याने तिने नाचण्यास नकार दिला. यावेळी नाचत नसल्याने व ग्राहकाला खूश करत नसल्याने कला केंद्र चालविणारी भाभी परभणीकर व तिचा भागीदार राजू ऊर्फ समीर खाटीकवाला (रा. नेकनूर, ता. बीड) यांनी लाठी-काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजू खाटीकवाला याने वायरने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अंधाऱ्या खोलीत रात्रभर डांबून ठेवले. पाच वर्षांपासून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचा सीमाचा गंभीर आरोप आहे.

ट्रकमधून गाठले जालनादरम्यान, राजू खाटीकवाला याची नजर चुकवून २ जून रोजी पहाटे सीमाने कला केंद्रातील अंधाऱ्या खोलीतून पळ काढला. ट्रकमधून तिने जालना गाठले. तेथून ती सेलूला गेली. गळ्यातील दागिने गहाण ठेवून ती दोन दिवसांनी बीडला परतली.

पोलिसांनी तक्रार घेतली नाहीदरम्यान, सीमाने बीडला आल्यावर शहर ठाणे, शिवाजीनगर ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र, तिची तक्रार घेतली नाही. पाठीवर मारहाणीचे व्रण दाखवूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा सीमाचा आरोप आहे. १३ जून रोजी सीमाने पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून १२ वर्षीय मुलीला त्या दोघांच्या तावडीतून सोडावे, पाच वर्षांपासून केलेल्या अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित महिलेने नेकनूर ठाण्यात अद्याप तक्रार दिलेली नाही. असा काही प्रकार घडला असेल तर माहिती घेतो. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- शेख मुस्तफा, सहायक निरीक्षक, नेकनूर ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड