लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : मुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले पण आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेक लोकांना त्यांनी घडवले, दु:खावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या कांही जण मात्र एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नांव मात्र दुसऱ्याचे घेतात, असा दुटप्पीपणा फार काळ चालणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले, त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला. त्यांच्या अशा संस्कारामुळे समाजातील वंचित पीडित घटकांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळते, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका, समोरु न वार करा, हारले तर सन्मानाने हार स्वीकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. आर टी देशमुख, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे, रमेश आडसकर, राजेंद्र मस्के, डॉ. स्वरूपिसंह हजारी आद यावेळी उपस्थित होते.पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, आज मुंडे साहेबांची जयंती नाही तर वाढिदवस आहे, त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस गडद होत आहेत, ह्या आठवणी जेवढ्या वेदना देतात, तेवढीच प्रेरणाही देतात.केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, निवडणूक प्रचारानिमित्त मी जेव्हा तेलंगणा, मध्यप्रदेशात गेले, तेव्हा तिथेही त्यांची पूजा होते. त्यांचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे.साहेबांचा लोकसंग्रह एवढा आहे की त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे, ही वाढ अशीच कायम होत राहील, असे कामं माझ्या हातून होतील. माझ्या प्रत्येक भूमिकेचा चेहरा व रंग वेगळा असला तरी आत्मा मात्र मुंडे साहेबांचाच आहे, त्यामुळे त्यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्याचे राजकारण बदललेमुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील गँगवॉर संपवले होते. तसे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गँगवॉर संपण्यात मला यश मिळाले आहे. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आम्ही काम करतो, आता त्यांची मुळं जमिनीत खोलवर गेली आहेत, ही मुळं चांगल्या विचाराची व संस्कृतीची आहेत, दहशतीची किंवा कुणाला त्रास देणारी नाहीत, असे त्या म्हणाल्या.याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर आ. आर टी देशमुख,आ. संगीता ठोंबरे, आ. सुरेश धस, आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे, आ. पवार, गोविंदराव केंद्रे, बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड, राधाताई सानप, यांनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्र माचे संचलन राम कुलकर्णी यांनी तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक यांनी प्रास्ताविक केले.
वारसा आणि नेते बदलणारे अपयशीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:15 AM
मुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले पण आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेक लोकांना त्यांनी घडवले, दु:खावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या कांही जण मात्र एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नांव मात्र दुसऱ्याचे घेतात, असा दुटप्पीपणा फार काळ चालणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली.
ठळक मुद्देपंकजा मुंडे : साहेबांनी कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही; नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका