जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २ हजार २५५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यापैकी १ हजार ६८० अहवाल निगेटिव्ह आले तर तब्बल ५७५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात बीड तालुक्यात सर्वाधिक १५०, अंबाजोगाई १२७, आष्टी ८०, धारुर ११, गेवराई १८, केज ५०, माजलगाव ३५, परळी ४८, पाटोदा २९, शिरुर २४ आणि वडवणी तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर सोमवारीही हे सत्र सुरूच राहिले. आणखी तीन मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात बीड तालुक्यातील गवळवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, कुर्ला येथील ५५ वर्षीय पुरुष आणि बीड शहरातील तेली गल्लीतील ६७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या २७ हजार ७७५ इतकी झाली आहे. पैकी २४ हजार ९४२ कोरोनामुक्त झाले असून ६६२ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, साथरोग अधिकारी पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
पुन्हा उच्चांक, ५७५ नवे रुग्ण तर तिघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:32 AM