शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

धक्कादायक ! महाराष्ट्रात १७ हजार महिलांची प्रसूती ‘हाय रिस्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:46 PM

सुरक्षित मातृत्व अभियानात गरोदर मातांची तपासणी

ठळक मुद्दे१७ लाख गरोदर महिलांची तपासणी१७ हजार महिलांना प्रसूतीदरम्यान अतिजोखीम सहन करावी लागणार आहे. प्रसूती सुखद करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. 

- सोमनाथ खताळ

बीड : राज्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत १८११ आरोग्य संस्थांमध्ये खाजगी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने गरोदर महिलांची तपासणी केली जाते. तीन वर्षांत १७ लाख महिलांची तपासणी केल असून चालू वर्षात तब्बल १७ हजार महिलांची प्रसूती ‘हाय रिस्क’ असल्याचे दाखविण्यात आले आहे. या महिलांना प्रसूतीदरम्यान अतिजोखीम सहन करावी लागणार आहे. ही आकडेवारी आरोग्य विभागाच्या एका अहवालातून ‘लोकमत’च्या  हाती लागली आहे.

मातृत्व अभियानांतर्गत प्रत्येक सरकारी आरोग्य संस्थेत खाजगी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने महिन्याच्या ९ तारखेला गरोदर मातांची तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्याप्रमाणे राज्यात हे अभियान सुरू करण्यात आले. मागील तीन वर्षांत राज्यात १८११ आरोग्य संस्थांमध्ये तब्बल १६ लाख ८९ हजार ७८० महिलांची तपासणी करण्यात आली.४ लाख ५७ हजार ३५५ महिलांची सोनोग्राफी केली असता हिमोग्लोबीन, डायबीटीज, हायपरटेंशन, रक्तशय अशा आजार असलेल्या महिलांची संख्या ७२ हजार ३२० एवढी असून २०१९-२० मध्ये १७ हजार ४४३ एवढा आकडा आहे. यांची प्रसुती ‘हाय रिस्क’ संबोधली गेली असून त्यांची प्रसूती सुखद करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. 

देशात महाराष्ट्र टॉपवरहे अभियान देशात राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्राने ८२० गुणे मिळवून पहिले स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकाचा क्रमांक लागतो. 

मराठवाड्यात बीड अव्वलआरोग्य संस्थांच्या संख्येत बीड जिल्ह्यातील ६५ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात ११ व्या तर मराठवाड्यात अव्वल स्थानी बीड आरोग्य विभाग आहे. मुंबईत सर्वाधिक १५३ आरोग्य संस्थांमध्ये हे अभियान राबविले जात आहे.

बीडमध्ये सर्वाधिक खाजगी डॉक्टरांची मदतराज्यात सर्वाधिक स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत बीड जिल्ह्यात आहे. तब्बल १०६ स्त्रीरोगतज्ज्ञ कसलाही मोबदला न घेता महिन्याच्या ९ तारखेला शासकीय संस्थेत जाऊन उपचार करतात. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीडने पहिले स्थान पटकावले आहे.

गरोदर मातांना दर्जेदार व तात्काळ उपचार बीडमध्ये १०६ खाजगी स्त्री रोगतज्ज्ञ मदत करीत आहेत. हायरिस्क असलेल्या मातांची नियमित तपासणी करून मार्गदर्शन केले जाते. या अभियानामुळे गरोदर मातांना दर्जेदार व तात्काळ उपचार मिळत आहेत.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

 एक नजर आकडेवारीवर (गरोदर माता)वर्ष     तपासणी     हायरिस्क    सोनोग्रॉफी२०१७-१८    ८२४३०९        ३०८०५    १८१८९४२०१८-१९    ७०३०५७        २४०७२    २२२१४१    २०१९-२०    १६२४१४        १७४४३    ५३३२०

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाBeedबीडWomenमहिलाHealthआरोग्यState Governmentराज्य सरकार