शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

अडाण्यापासून उच्चशिक्षित उमेदवार बीडच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:30 AM

देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा असल्याने या मतदार संघाचे राजकीयदृष्ट्या महत्व आहे.

ठळक मुद्देराजकीय आखाड्यातील शिक्षण : बीड लोकसभेच्या रिंगणात हौसे, गवसे, नवसेही

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा असल्याने या मतदार संघाचे राजकीयदृष्ट्या महत्व आहे. त्यातल्या त्यात मुंडे बहिण- भावांमध्ये रंगणाºया प्रचारयुद्धाने हा मतदार संघ ढवळून निघाला आहे.बीड लोकसभा मतदार संघात भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह इतर सात अशा एकूण दहा पक्षांचे उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. तर २६ उमेदवार अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. देशाच्या दृष्टीने महत्वाची असलेल्या लोकसभा निवडणुकीकडे मतदार कशा रितीने पाहतात हे १८ एप्रिलच्या मतदानातून दिसून येईल. परंतु रिंगणात उतरताना इतर कोणालातरी मदत होईल याचे गणित बांधत सोयीच्या उमेदवाराने अशा अपक्षांना विशिष्ट भागात मैदान मोकळे सोडले आहे. लोकसभेसाठी लोकप्रतिनिधी निवडून देताना त्याचा राजकीय प्रभाव, संघटनात्मक बांधणी, मॅन, मनी, मसल ‘थ्री एम’ फॅक्टर व्यवस्थापन कौशल्यातून चांगल्या तºहेने हाताळणारा उमेदवार मैदानात टिकून राहतो, असा जनतेचा अनुभव राहिलेला आहे. तसेच लोकसभा निवडणूक लढविणाºया उमेदवाराचे शिक्षण हाही महत्वाचा विषय असतो.बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या शिक्षणाचा आढावा घेतल्यानंतर शिक्षण कितीही असो पण लोकप्रतिनिधी बनण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे दिसते. २० लाख मतदारांमध्ये आपला टिकाव राहील की नाही याचा विचार न करता हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही उमेदवार तर प्रत्येक निवडणुकीत (पालिका, विधानसभा, लोकसभा) आपले नशीब अजमावत राहिले परंतु लोकप्रतिनिधी होण्याची संधी त्यांना अद्याप मतदारांनी दिलेली नसल्याचे दिसते.बीड मतदार संघाच्या निवडणुकीत अगदी अशिक्षितापासून उच्च शिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. काही जण इयत्ता तिसरी उत्तीर्ण आहेत. तर बहुतांश जण बारापवीपर्यंत शिकलेले आहे.प्रमुख पक्षांचे उमेदवार अन् शिक्षणभाजपा - डॉ. प्रीतम मुंडे - (एम.डी.)राष्टÑवादी काँग्रेस - बजरंग सोनवणे,(बी.ए. कला पदवीधर),वंचित बहुजन आघाडी -प्रा. विष्णू जाधव -(एम.कॉम.,बी.एड.)हम भारतीय पार्टी -अशोक थोरात (दहावी नापास)भारतीय प्रजा सुराज्य पक्षकल्याण गुरव (बारावी.)महाराष्टÑ क्रांती सेना -गणेश करांडे, (बी.ए.एल.एल.बी, एम.बी.ए.,बी.जे.)दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल- रमेश गव्हाणे- (बारावी)आंबेडकराईट पार्टी - चंद्रप्रकाश शिंदे - (दहावी)समाजवादी पार्टी - सय्यद मुजम्मील स. जमील- (बारावी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliticsराजकारण