इतिहासाची पुनरावृत्ती; आमदार सोळंकेंना शह देण्यासाठी डक यांचे प्यादे पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:49 PM2020-09-07T14:49:35+5:302020-09-07T15:14:08+5:30

८० च्या दशकात माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या विरोधात गोविंदराव डक यांना उभेकरून शरद पवार यांनी रात्री १२ वाजता ऐतिहासिक सभा घेतली होती

History repeats itself; Ashok Dak's pawns move forward to counter MLA Prakash Solanke | इतिहासाची पुनरावृत्ती; आमदार सोळंकेंना शह देण्यासाठी डक यांचे प्यादे पुढे

इतिहासाची पुनरावृत्ती; आमदार सोळंकेंना शह देण्यासाठी डक यांचे प्यादे पुढे

googlenewsNext

- सुधीर महाजन 

माजलगाव तालुक्यात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. मुंबई बाजर समितीच्या सभापतीपदी अशोक डक निवडून आले, ही राष्ट्रवादीची अंतर्गत खेळी दिसते. आ. प्रकाश सोळंके यांना शह देण्यासाठी अजित पवारांनी हे प्यादे वापरले. ४० वर्षांपूर्वीही असेच घडले होते. प्रकाश सोळंकेंचे वडील सुंदरराव सोळुंके हे माजी मंत्री ते बीड जिल्हा परिषदेचे ६२ ते ६७ अध्यक्ष नंतर ६७ ते ७२ केज मतदारसंघात निवडून आले. ७२ ते ७७ गेवराई मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. ७७ ते ८० माजलगाव मतदारसंघात निवडून आले.

वसंतदादा पाटील यांना धोका देत शरद पवार (पुलोद) सोबत येऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांना उद्योग, बांधकाम, छपाई, दुग्धविकास यासह महत्त्वाची खाती मिळाली. १९८० राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर ते परत शरद पवार यांना सोडून काँग्रेसमध्ये गेले. सोळंके उपमुख्यमंत्री असताना गोविंदराव डकांना पंचायत समितीचे सभापती व्हायचे होते; परंतु सोळंके यांनी त्यांना सभापती केले नाही. त्यामुळे ते नाराज होते. शरद पवार यांनी डकांना घरी तिकीट पाठवून निवडणूक लढण्यास भाग पाडले व मतदानाच्या एक दिवसअगोदर पवार यांनी रात्री १२ वाजता ऐतिहासिक सभा घेतली. त्याचवेळी सोळंकेंचा पराभव निश्चित झाला. सोळंके हे साडेबारा वर्षांत साडेअकरा वर्षे वेगवेगळ्या पदांवर मंत्री राहिले. ते आपल्याला सोळंके पुढे अडथळा निर्माण करू शकतात म्हणून पवारांनी त्यांना पराभूत केले. १५० किलो वजनाच्या गोविंदराव डक यांना पाहायला मुंबईहून लोक येत होते. सोळंके त्यानंतर पराभवातून सावरलेच नाहीत व पुन्हा निवडणूक लढवली नाही.

२००९ साली प्रकाश सोळंके यांचा प्रचार करण्यामध्ये अग्रेसर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक डक व मोहन जगताप यांना निवडून आल्यानंतर प्रकाश सोळंकेंनी बाजूला केले. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक डक व मोहन जगताप यांनी पक्षात राहून सोळंकेंच्या विरोधात शरद पवार यांना सांगून प्रचार केला. 

अशोक डक अजित पवार यांचे विश्वासू 
१७ वर्षांपूर्वी अशोक डक यांनी भाजपकडून जि.प.मध्ये दोन वर्षांनंतर अजित पवारांकडे जाऊन जि.पमध्ये सत्तांतर केले. यावेळी गोपीनाथराव मुंडे यांना मोठा दणका दिला. तेव्हापासून अशोक डक हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. २०१४ साली विरोधात प्रचार केल्यानंतर २०१५ साली माजलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत केवळ  एकटेच निवडून आलेल्या डक यांना सभापती करा, असे सोळंके यांना सांगितल्यावर त्यांनी यावर विरोध दर्शविला. त्यावर पवारांनी २०१९ ची उमेदवारी आजच डकांची जाहीर करतो, असे म्हणताच डकांना सभापतीपद दिले होते.

Web Title: History repeats itself; Ashok Dak's pawns move forward to counter MLA Prakash Solanke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.