लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यातील हिवरसिंगा गावात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याने भयग्रस्त परिस्थिती होती. ती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून अँटिजन कॅप आयोजित केला. ७० टेस्टमधे फक्त एकच बाधित निघाल्याने आता गावची शून्याकडे वाटचाल सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
तालुकाभर कोरोनाने आपले क्षेत्र काबीज केले होते. त्यात हिवरसिंगा गावात रुग्ण संख्या वाढत होती. हा चिंतेचाच विषय बनला होता. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अँटिनज तपासणी शिबिराचे आयोजन केले. ७० संशयित तपासणीअंती फक्त एकच बाधित आढळून आल्याने काहीसा दिलासा मिळाला. आता पुन्हा नव्याने रुग्ण निघू नये याची सर्वच खबरदारी घेत असल्याने आकडा शून्यावर येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या कामी डॉ. आरेकर, प्रवीण थिगळे, शेख साजीद, भारत नागरगोजे, लखन जाधव, श्रीमती बेदरे यांनी कॅप यशस्वीसाठी परिश्रम घेतले. सरपंच रंजना सानप, चंद्रकांत सानप, माउली सानप, सानप गुरुजी, एम.बी शिंदे, लखन हातागळे, लक्ष्मी सुरसे, जयश्री चौधरी, छबू बडे यांनी सहकार्य केले.
===Photopath===
220521\vijaykumar gadekar_img-20210521-wa0064_14.jpg
===Caption===
हिवरसिंगा गावात कोरोना अँटिजन तपासणी िशिबिराचे आयोजन केले होते. यात ७० पैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. यामुळे गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.