बीड : विविध मागण्यांसाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा, सेविकेला तृतीय आणि मदतनीसांना चतुर्थ श्रेणीचे लाभ द्यावेत, केरळ, आंध्र, तेलंगणा, हरियाणापेक्षा जास्त मानधन महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, समान किमान कार्यक्रमांतर्गत सरकारने मानधन वाढीच्या आश्वासनांची पूर्तता करावी, अंगणवाडी केंद्रांचे भाडे सुधारित करावे, केंद्र शासनाच्या आदेशानुसार विविध विमा योजनांची अंमलबजावणी करावी, आयसीटी आणि आरटीएम कॅस अंतर्गत सीमकार्ड रिचार्जसाठी नवीन दर लागू करावेत, रिक्त जागा भराव्यात, मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित सेविकेइतके मानधन द्यावे, सेवानिवृत्तीचा लाभ निवृत्तीच्या दिवशीच द्यावा आदी मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिका-यांना देण्यात आले.निवेदनावर राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे पदाधिकारी भगवान देशमुख, दत्ता देशमुख, कमल बांगर, सचिन आंधळे यांच्या सह्या आहेत.
अंगणवाडी सेविकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:09 AM
विविध मागण्यांसाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला.
ठळक मुद्दे२३ मागण्यांचे निवेदन : घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणला