शिरूर कासार : तीन दिवसांपासून लाॅकडाऊन नियमांचे पालन कोटेकोर होत असून येथील गांधी चौकातील मानाची तथा सार्वजनिक होळी स्थगित करावी लागली. आपापल्या घराच्या दारातच छोटी होळी करून तिच्या साक्षीने एकट्यानेच बोंब मारल्याचे चित्र रविवारी दिसून आले. सोमवारच्या धूलिवंदनाच्या आनंदावरसुद्धा विरजण पडणार आहे. कोरोनाने संपूर्ण संस्कृतीच्या रंगाचा बेरंग केला आहे.
मराठी वर्षांचा शेवटचा महिना म्हणचे फाल्गुन (शिमगा) मानला जातो. या महिन्यात ऊन तापत असते. शेतातील कामे जवळपास आटोपलेली असतात. मग होळी साजरी करण्यासाठी सर्वच जण आनंदाने होळीभोवती बोंब मारतात. वाईट गोष्टींची होळी करून नव्या वर्षात चांगल्या संकल्पाची गुढी उभारली जाते.
मागील वर्षी आलेल्या ‘कोरोना’ महामारीने अजूनही पिच्छा सोडला नाही. गत वर्षीदेखील याच महिन्यात लाॅकडाऊन पडले होते. याही वर्षी पुन्हा एकदा तशीच परिस्थिती असल्याने तीन दिवसांपासून लाॅडाऊनचा अंमल सुरू असल्याने नियमांच्या पाशात होळीचा सण जखडला गेला. येथील गांधी चौकात सार्वजनिक होळी पेटवली जाते. त्याभोवती सर्वच बोंब मारत असतात. चोरून आणलेल्या गोव-या, मानाच्या पाच गोवऱ्या, शिवाय सरपण रचून मारुतीरायाच्या समोर होळी पेटवली जाते. रात्री शिमग्याचे (देवीचे) सोंग निघत असते. ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येत असतात. यंदा मात्र ना होळी नाही शिमग्याचे सोंग, या आनंदावर विरजण पडले आहे. होळी रे होळी पुरणाची पोळीची बोंब आता पुरणाची पोळी आहे; परंतु होळी नसल्यात रूपांतरित झाली आहे.
===Photopath===
280321\vijaykumar gadekar_img-20210328-wa0022_14.jpg