फोटो आहे.
...
वादळाने वीज पुरवठा खंडित
शिरूरकासार :
तालुक्यात रात्री साधारणपणे दहाच्या सुमारास जोराचे वारे सुटले होते. त्यातच पाऊससुध्दा सुरू झाला होता. वारे आणि पाऊस सुरू होताच लाईट गेली. ती पहाटेपर्यंत आली नसल्याने उकाडा व डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. रात्र जागून काढावी लागली.
...
कडक लाॅकडाऊन तरीही रस्त्यावर वर्दळ
शिरूर कासार :
शनिवारी मध्यरात्रीनंतर कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. पोलीस रस्त्यावर गस्त घालत होते. मात्र, काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत होते. पोलीस सक्रिय झाले असून, कुणीही विनाकारण बाहेर पडू नये, अन्यथा कारवाई अटळ असल्याचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी सांगितले. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
...
शनिवारी पुन्हा कोरोनाचा आकडा शंभरीकडे झुकला
शिरूर कासार :
गेली तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा खाली येत असल्याने दिलासा मिळत असल्याचे जाणवत होते. मात्र, शनिवारी पुन्हा कोरोनाचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. आता तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. विनाकारण बाहेर फिरू नये. होम क्वारंटाईन असलेल्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी संयुक्तपणे केले आहे.
...
लोणचे घालण्याची लगबग
शिरूर कासार : पावसाळा तोंडावर आला की कैऱ्या पाडाला लागतात. त्या झाडावरून खाली घेतल्या जातात. काही कैऱ्या आढीला पिकवण्यासाठी लावल्या जातात, तर काही कैऱ्यांचा लोणच्यासाठी वापर केला जातो. सध्या ग्रामीण भागात लोणचे घालण्याची सर्वत्र लगबग दिसून येत आहे. कैऱ्यांच्या फोडी करण्यात अनेक जण व्यस्त झाले आहेत.
फोटो
...
जिल्हा परिषद शाळेला निसर्ग फुलांची सजावट
शिरूर कासार :
येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजुंनी असलेल्या लालबुंद गुलमोहर फुलांनी निसर्ग सजावट केली आहे. हे दृष्य चांगलीच मोहिनी घालत आहे. शाळेच्या नामफलकालाच लालभडक निसर्ग फुलांची माळ घातली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गुलमोहोराची झाडे ठिकठिकाणी फुललेली दिसत आहेत.
फोटो