माजलगाव : कोरोना लॉकडाऊनने आलेल्या आर्थिक नैराश्यातून शहरातील एका हॉटेलचालकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सुरेश तुकाराम सुपेकर (वय ५३, रा. जुजगर गल्ली, माजलगाव) असे आत्महत्या केलेल्या हॉटेलचालकाचे नाव आहे. सुपेकर हे गेल्या २० वर्षांपासून किरायाच्या जागेत हॉटेल व्यवसाय करतात. सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल झाल्याने हॉटेल व्यवसायास परवानगी देण्यात आली. जुन्या कोर्ट रोडसमोरील नगर परिषदेच्या गाळ्यातील आपले हॉटेल उघडून साफसफाई करण्यासाठी सुरेश सुपेकर पहाटे पाच वाजता गेले होते. ते घरी आंघोळ करण्यासाठी वापस न आल्याने त्यांचा छोटा मुलगा शुभम त्यांना पाहण्यासाठी हॉटेलवर गेला. त्यावेळी त्याला हॉटेलचे शटर बंद असलेले दिसले. त्याने शटर उघडले असता त्याचे वडील हॉटेलमधील छताच्या पंख्याला गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत त्याला दिसले. याची खबर त्याने घरच्यांना दिली. सुरेश सुपेकर यांना बाजूलाच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेेले. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी सुरेश सुपेकर हे मयत झाल्याचे घोषित केले. दरम्यान, मयत सुरेश सुपेकर यांचे मोठे पुत्र संदीप सुरेश सुपेकर यांच्या माहितीवरून शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
===Photopath===
070621\purusttam karva_img-20210607-wa0024_14.jpg
===Caption===
सुरेश तुकाराम सुपेकर