बनसारोळा : तालुक्यातील होळ, बनसारोळा, युसूफवडगाव गटातील बहुतांशी रस्ते रहदारी सारखे राहिलेले नाहीत. वारंवार मागणी निवेदन करूनही उपयोग झाला नाही. रस्त्यांच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली कळंब- अंबाजोगाई राज्य महामार्गावर बोरीसावरगाव येथे मंगळवारी रोजी एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शासन,प्रशासन मुर्दाबाद,अकार्यक्षम लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध, रस्ते द्या,नसता मतदानावर बहिष्कार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले तर युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विजय आटोळेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तहसीलदार डी.सी मेंडके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन कांबळे, जि .प. बांधकाम उपविभाग केज अभियंता बी. ई.खेडकर, आदींच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
चंदनसावरगाव-जवळबन, जवळबन-बोरीसावरगाव,
सावळेश्वर-जवळबन,
डिघोळआंबा-कानडी बदन, बनसारोळा- सौंदाणा,
बनसारोळा-आवसगाव,
सावळेश्वर-आवसगाव,
नायगाव-आवसगाव,
बनसारोळा-इस्थळ,
लाडेगाव-औरंगपूर,
लाडेगाव-दिपेवडगाव
लाडेगाव-जवळबन
कानडीबदन-सोमनाथबोरगा
पैठण-वाकडी
आनंदगाव-सारणी
आनंदगाव-भाटुंबा
आनंदगाव-सोनिजवळा
आनंदगाव-पाथरा
लोखंडी सावरगाव-बोरीसावरगाव (अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्ग) हे रस्ते गेल्या दहा वर्षांपासून प्रचंड मोठे खड्डे पडून खराब झाल्याने नागरिकांना ,आबालवृद्धांना दैनंदिन वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. यातील काही रस्ते कागदोपत्री केल्याचे दाखवून बोगस बिले उचलली आहेत संबंधित गुत्तेदार,अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. हे रस्ते तत्काळ नव्याने मंजूर करावेत, काही रस्ते दुरुस्ती करावेत या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले.
जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि. उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ,लहू गायकवाड , सुग्रीव करपे शिवाजी शिंपले,बंडोपंत कुलकर्णी ,हनुमंत साने,अशोक साखरे,लक्ष्मण काकडे ,अशोक धायगुडे,इस्थळ दत्ता शिंदे,गोविंद शिनगारे,सरपंच गणेश राऊत,अशोक भोगजकर,चंद्रकांत अंबाड, दत्ता साखरे, मनोहर करपे,नवनाथ काकडे, रमेश गोरेमाळी ,सुनील शिनगारे आदींसह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होते. १५ ऑगस्टपर्यंत नवीन रस्ते व दुरुस्ती न झाल्यास प्रत्येक गावात ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येणार असून १६ ऑगस्टपासून गनिमी कावा आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सांगितले.
270721\img-20210727-wa0147_14.jpg