काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे.
दारू विक्री बंद करण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारुबंदीची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे.
झाडे बहरू लागली
बीड : शहरातील दुभाजकांवर सुशोभिकरणाची झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे सद्यस्थितीत चांगल्या प्रकारे बहरू लागल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. निगा राखण्याची मागणी आहे.
सिग्नल सुरू करा
बीड : मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेकवेळा वाहनधारक, नागरिकातून सुरू करण्याची मागणी होत आहे.
गतिरोधकाची दुर्दशा
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.
सुविधा द्याव्यात
नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेते व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.
‘जैविक’ने धोका
अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.