माजलगाव : येथील नगरपालिकेमार्फत राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या २५८ लाभार्थ्यांना २ कोटी १० लाख रुपये अनुदानाच्या धनादेशाचे आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते गुरुवारी वितरण करण्यात आले.या वेळी नगराध्यक्ष शेख मंजूर,मुख्याधिकारी विशाल भोसले,अच्युतराव लाटे,नगरसेवीका उषा बन्सोडे,नगरसेवक रोहन घाडगे,भागवत भोसले,राहुल लंगडे,तौफिक पटेल,नारायण होके,सचिन डोंगरे,इम्रान कोंबडीवाले,नानाभाऊ शिंदेसह लाभार्थी उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरातील गरजू बेघर नागरिकांना जास्तीत जास्त प्राधान्य देत नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे योजना राबविली जात आहे. माजलगाव नगरपालिकेतर्फे गुरुवारी आ. प्रकाश सोळंके यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
पहिल्या टप्यात ५६६ पैकी २७४ लाभार्थ्यांना प्रत्येकी ४० हजारांप्रमाणे तर १८९ लाभार्थ्यांना ६० हजार रुपये दुसऱ्या टप्प्यातील धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात आ. सोळंके यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
लाभार्थ्यांना यापूर्वी २ कोटी १६ लाख रुपये वाटप करण्यात आले. त्यातील छत झालेल्या १३० लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे तर ८० लाभार्थ्यांना ६० हजार रुपये प्रमाणे तसेच कामाची सुरुवात केलेल्या ३८ लाभार्थ्यांना लोकांना ४० हजार रुपयांप्रमाणे धनादेशाचे अच्युतराव लाटे,नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. रमाई घरकुल अंतर्गत २५ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयेप्रमाणे अनुदानाचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी बोलताना आ. प्रकाश सोळंके म्हणाले की, माजलगाव शहर सुंदर बनविण्याचे कार्य नगराध्यक्ष शेख मंजूर करत असून लाभार्थ्यांनीही आपआपले घरे सुंदर बनवून शहराच्या सौंदर्यात भर घालावी. नगराध्यक्ष शेख मंजूर म्हणाले, शहरातील एकही नागरिक बेघर राहणार नाही. त्याची काळजी घेत पुन्हा ५७८ नवीन लाभार्थ्यांना मंजुरी दिली असून त्यांनी आपआपले घराचे काम सुरू करावे. त्यांचाही निधी मंजूर झालेला लवकरच पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात लाभार्थी,नागरीक,कर्मचारी उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आवास योजनेचे धनादेश वाटपाची ही पहिलीच वेळ असून लाभार्थी नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
--------------------------------
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुंदर घर बांधणाऱ्या पहिल्या तीन लाभार्थ्यांना २१ हजार,११ हजार आणि ७ हजार रुपयांचे बक्षीस माजलगाव नगरपालिकेतर्फे देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी जाहीर केले.
------------------------------------
020921\purusttam karva_img-20210902-wa0036_14.jpg