रस्त्यावर धुळीचे थर परळी : शहरात सर्वत्र रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. न.प.ने धुळीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नियमांची एैशीतैसी
अंबाजोगाई : शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय, यामुळे रस्ता अरुंद होत आहे.
पथदिवे बंद
माजलगाव : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक खेड्यांमध्ये अघोषित भारनियमन सुरूच आहे. यामुळे नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात असणारे बहुतांश पथदिवे बंद स्थितीत राहतात. परिणामी चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
नद्यातून वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे.