बीड : पारंपारिक पिकांना फाटा देत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकांची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील शेतक-यांनी कष्टाने झाडे वाढवली होती. मात्र मागील आठवड्यात पारा १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरल्यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेकडो एकर वरील केळीच्या बागा करपल्या आहेत, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यातील पारंपारिक कापूस, सोयबीन, ऊसासह इतर पिकांना फाटा देत पालसिंगण, नांदूर, सात्रा-पोथरा, यासह परिसरातील शेतकºयांनी केळीचे पीक घेतले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पाणी कमी पडू लागल्यानंतर टँकरच्या माध्यमातून शेतकºयांनी पाणी दिले होते. फळ लागण्याच्या वेळी बाग करपू लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागेची पाहणी करुन शासनाच्या वतीने अनुदान जाहीर करावे व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.शेतकºयांची मदतीची मागणी : जिल्हाधिकाºयांकडे दिले निवेदन४एका हेक्टरसाठी साधारण ३ ते ४ लाख रुपये खर्च केला आहे. दहा दिवसापूर्वी १० अंश सेल्सिअसच्या खाली पारा आल्यामुळे केळीच्या झाडांची पाने करपू लागली आहेत.४पानं करपल्यामुळे केळीच्या घडांवर परिणाम झाला व संपूर्णपणे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही देखील तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या बागाचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी दिली.४थंडीमुळे नुकसान होऊ नये यासाठी औषध फवारणी, बागेमध्ये दोन वेळा धूर करणे तसेच हॅलोजन लाईट्स देखील लावले आहेत. तरीदेखील केळीचे घड काळवंडून गेले आहेत, अशी माहिती पालसिंगण येथील शेतकरी जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पारा घसरल्याने शेकडो एकरातील केळीचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:51 AM
पारंपारिक पिकांना फाटा देत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकांची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील शेतक-यांनी कष्टाने झाडे वाढवली होती.
ठळक मुद्देपालसिंगण शिवारातील शेतकरी अडचणीत : हातातोंडाला आलेला घास कडाक्याच्या थंडीने घेतला हिरावून