शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

बीडमध्ये रक्तदान आंदोलनातून माणुसकीचे नाते घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:49 PM

बीड : मराठा आरक्षणासाठी परळीत २१ दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर शासनाच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.मंगळवारी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे व तहसीलदार शरद झाडके यांनी सायंकाळी आंदोलकांशी संवाद साधला. धारूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलनावेळी आलेल्या रूग्णवाहिकेला आंदोलकांनी रस्ता मोकळा ...

ठळक मुद्देबीड, गेवराई, केज, माजलगावात आगळे आंदोलन, लहुरी ते केज टाळांच्या गजरात रॅली

बीड : मराठा आरक्षणासाठी परळीत २१ दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर शासनाच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

मंगळवारी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे व तहसीलदार शरद झाडके यांनी सायंकाळी आंदोलकांशी संवाद साधला. धारूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलनावेळी आलेल्या रूग्णवाहिकेला आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. दरम्यान केज, माजलगाव आणि गेवराईत ठिय्या आंदोलन सुरूच होते. ग्रामीण भागातून दुचाकी रॅली तालुक्याच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आल्या. तर आरक्षणासाठी केलेल्या रक्तदान आंदोलनात बीड, केज, गेवराई आणि माजलगावात जवळपास ७०० जणांनी उत्स्फूर्त रक्तदान करत माणुसकीचे नाते घट्ट केले.बीडमध्ये ३७५ जणांचे रक्तदानबीड : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी बीडमध्ये मंगळवारी नियाजनाप्रमाणे उत्स्फूर्त रक्तदान आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्यकीय क्षेत्रातील सकल मराठा समाजाने ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. मराठा डॉक्टर, औषध विक्रेते, औषध कंपनीचे प्रतिनिधी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक न्याय भवनात सायंकाळपर्यंत ४०० आंदोलकांनी स्वत: नोंदणी करून रक्तदान केले. रक्तदानासाठी नोंदणीपासून पूर्वतपासणी व इतर पूरक मदत तसेच रक्त संकलनासाठी जिल्हा रूग्णालयाच्या जीवन अमृत रक्तपेढी व रूग्णालयातील ४० कर्मचाºयांचा ताफा सज्ज होता. त्यांना आंदोलकांच्या वतीने सहकार्य करण्यात येत होते. त्यामुळे विनाअडथळा रक्तदान आंदोलन पार पडले.केजमध्ये पाचव्या दिवशीही ठिय्याकेज : केजमध्ये पाचव्या दिवशीच्या ठिय्या आंदोलनात तालुक्यातील लहुरी व पैठण येथील सकल मराठा समाजाने टाळ मृदंगाच्या गजरात गावापासून आंदोलन स्थळापर्यंत रॅली व मोर्चा काढून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली. शहरातून ठिय्या एक मराठा लाख मराठा व इतर घोषणांनी वातावरण दणाणले.

६८ जणांचे रक्तदानमंगळवारी केज येथे आंदोलनस्थळी रक्तदानासाठी १५० मराठा युवकांनी नोंद केली होती. संकलनाच्या बॅगच्या कमतरतेमुळे ६८ जणांनाच रक्तदान करता आले. एकावेळी दोघांना रक्तदान करता येईल याची व्यवस्था करण्यात आली होती. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाचे डॉ. डाके व रक्तपेढीच्या टीमने रक्तसंकलन केले.जातेगाव, तलवाडा येथून रॅली आंदोलनस्थळीगेवराई : आरक्षणाच्या मागणीसाठी येथील सकल मराठा क्र ांती ठोक मोर्चाच्या वतीने पाच दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी दिवसभरात २०० जणांनी रक्तदान केले. रक्तदान आंदोलनात एका वेळेला ३ जणांचे रक्तदान होत होते. मंगळवारी दुपारी आंदोलन स्थळी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर तालुक्यातील जातेगांव, रेवकी, तलवाडा,पांढरवाडी इ. गावांतील तरूणांनी गेवराईतील आंदोलन स्थळापर्यंत शंभरपेक्षा जास्त दुचाकी व रिक्षाची रॅली काढून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. पांढरवाडी येथील शेकडो महिलांनी मुला-बाळांसह शेकडो महिला रॅली काढून ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या.

माजलगावला रक्तदान, जागरण गोंधळमाजलगाव : मराठा आरक्षणप्रश्नी येथील तहसील कार्यालयामोर सातव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच आहे. मंगळवारी रक्तदान आंदोलनात दुपारपर्यंत ५१ तरूणांनी सहभाग नोंदविला. शहरातील सर्व मराठा डॉक्टर आंदोलनस्थळी उपस्थित होते. सकाळपासून जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्र म पार पडले. दररोज विविध गावचे मराठा समाजातील नागरिक यात सहभागी होत आहेत तर विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. 

टॅग्स :BeedबीडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा