लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील प्रभू श्री वैद्यनाथ मंदिर पायरीचे शेवटच्या श्रावणी सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांनी बिल्व पत्र वाहून व महिलांनी शिवामूठ सातू वैद्यनाथ मंदिर पायऱ्यावर वाहिले. मंदिर बंद असतानाही गेल्या चार श्रावण सोमवारी भाविक पायरी दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिर परिसरात मोठ्या संख्येने आले होते.
पाचव्या श्रावण सोमवारी विशेष म्हणजे पोळा सण असतानाही मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. वैद्यनाथ मंदिरासमोरील शिवलिंग पंचमुखी महादेव मंदिर व प्रतिवैद्यनाथ मंदिर, संत जगमित्र नागा मंदिर व दक्षिणमुखी गणपती मंदिर येथेही भाविकांनी शारीरिक अंतर ठेवत दुरून दर्शन घेतले. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंदिर बंद ठेवलेले आहे. तरीही भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात येत आहेत. श्रावण या पवित्र महिन्यात श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगस्थळी राज्य व परराज्यातून भाविकांनी मंदिर पायरीचे दर्शन घेतले आहे.
...
श्रावण महिन्यात श्री वैद्यनाथ मंदिर बंद असल्याने पायरी दर्शन घेऊन समाधान मानावे लागले.
- अनिरुद्ध चव्हाण, उद्योजक, पुणे
...
श्रावण महिनाभर मंदिर परिसरात भाविकांची रेलचेल होती. परंतु आता श्रावण महिना संपल्याने या परिसरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट होत आहे.
-श्याम बुद्रे, हॉटेल व्यवसायिक, परळी
060921\img-20210906-wa0341_14.jpg
परळी येथे १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील प्रभू श्री वैद्यनाथ मंदिराच्या पायरीचे शेवटच्या श्रावणी सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन घेतले.