लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कामधेनू संस्था संचलित, वसुंधरा महाविद्यालयाने येथे कोविड केअर सेंटर उभारून आपली बांधिलकी जोपासली आहे. यातून अनेक रुग्ण बरे होऊन आपल्या कुटुंबात घरी परतले आहेत, तर अनेकांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन वसुंधरा महाविद्यालयाने बीड जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, मानवलोक, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने जामिया इस्लामिया इशातूल उलूम आयटीआय कॉलेजच्या बीड शहरातील मोंढा भागातील संस्थेच्या इमारतीत २४ एप्रिल रोजी पन्नास खाटांची अद्ययावत असे कोविड सेंटर उभारून रुग्णसेवा सुरू केली. कोविड सेंटर सुरू झाल्यापासून या ठिकाणी एकूण १७० रुग्ण भरती झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एकूण ९९ रुग्णांना उपचाराअंती घरी पाठवले गेले.
घरी विलगीकरणासाठी पाठवलेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ आहे; तर गंभीर झालेल्या ३५ रुग्णांंना हायर सेंटरला पाठवले गेले आहे. सध्या २२ रुग्ण उपचार घेत आहेत. घाटनांदूर आरोग्य केंद्राचे
वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास घोळवे हे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहात असून, ते स्वतः रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांना डॉ. माधव जाधव, डॉ. गणेश माले, डॉ. सुवर्णा मुंडे, व्यवस्थापक मंगेश वालेकर, स्टाफ नर्स सुजाता घुंडरे,
शीतल साळुंके, ज्योती राठोड, संगीता अवचार,
संगीता भालेराव, सर्फराज पठाण, गणेश होलबोले, रवी हजारे आदी कर्मचारी सहकार्य करीत आहेत. रुग्णांना दोनवेळ चहा, नाष्टा, दोनवेळ जेवणाची व्यवस्था शेख आयुब शेख फकीरशेठ हे पार पाडत आहेत. दररोज रुग्णांकडून व्यायाम व योगा करून घेतला जात आहे. गीतगायन, कविता वाचन, कथाकथन आदी कार्यक्रमांद्वारे रुग्णांना प्रसन्न ठेवले जात आहे.
...
सामाजिक बांधिलकीतून सेंटरची उभारणी
गेल्या २१ वर्षांपासून कामधेनू सेवाभावी संस्थेचे वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर परिसरात सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून घाटनांदूर व परिसर पंचक्रोशीतील गावासाठी हे कोविड सेंटर संस्थेच्या माध्यमातून चालविले जात आहे. त्याचा लाभ परिसरातील रुग्णांसाठी होत आहे, असे संस्थेचे सचिव गोविंद देशमुख यांनी सांगितले.
===Photopath===
220521\narshingh suryvanshi_img-20210519-wa0033_14.jpg
===Caption===
घाटनांदूर येथील वसुंधराच्या कोविड सेंटरमुळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सेंटरमधील रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर.