धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथे २५/१५ योजनेंतर्गत गावात चार ठिकाणी सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. तीन ठिकाणी ३ लाख, तर एका ठिकाणी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले; परंतु हे काम करताना सोलिंग करण्यात आलेले नाही, तसेच रस्त्याची उंची व जाडी कमी आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट पद्धतीने करण्यात आलेले आहे. याबाबत अशोक करे यांनी यापूर्वीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आठवड्यापूर्वी निवेदन देत उपोषणाचा इशाराही दिला होता; परंतु झाेपलेल्या प्रशासनाने यावर कसलीच कारवाई केली नसल्याने संतापलेल्या करे यांनी मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. दुपारपर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिलेली नव्हती. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपाेषण मागे घेणार नसल्याचे करे यांनी सांगितले आहे.
240821\24_2_bed_11_24082021_14.jpg
जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसलेले अशोक करे.