ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 10 - गरिबी व पोटाच्या आजाराला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे समजताच नैराश्यातून पत्नीने स्वत: विष घेऊन दोन मुलांना विष दिल्याची घटना तालुक्यातील होळ येथे घडली आहे. उपचारादरम्यान ३ महिन्याच्या बालिकेनेही प्राण सोडले असून, पत्नी आणि ४ वर्षीय बालक मृत्यूशी झुंज देत आहे.
होळ येथील पांडुरंग आश्रुबा घुगे (२७) या तीन एकर शेती पिकवत असलेल्या तरु ण शेतकºयाने गरिबीस कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. तो दोन दिवसापासून बेपत्ता होता. चंदनसावरगाव शिवारात विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही नैराश्यातून दोन चिमुकल्या मुलांना विष पाजले. या महिलेसह दोन चिमुकल्यांवर अंबाजोगाई येथील स्वाराती रु ग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचारादरम्यान तीन महिनयच्या अक्षरा पांडुरंग घुगे या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर चार वर्षाच्या आदित्य पांडुरंग घुगे या मुलावर अंबाजोगाई स्वारातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून मृत्यूशी झुंज देत आहे. गरिबीला कंटाळून पांडूरंग घुगे या तरुण शेतकºयाने आत्महत्त्या केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुलगी व पित्याचा मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे होळ परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.